Waqf Amendment Bill Saam tv
देश विदेश

Waqf Amendment Bill: सर्वोच्च न्यायालयाची वक्फला स्थगिती; याचिकेवर 7 दिवसांत केंद्र देणार उत्तर

Waqf Amendment Bill: वक्फ विधेयकाविरोधात याचिका दाखल झाल्यानंतर आता वक्फला तात्पुरती स्थगिती देण्यात आलीय. लोकसभा, राज्यसभेत मंजुरी वक्फ कायदा मंजूर झाल्यानंतर, तसेच राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतरही वक्फला ही स्थगिती का देण्यात आली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सर्वोच्च न्यायालयात वक्फ कायद्यावर आक्षेप घेणाऱ्या जवळपास 150 हून अधिक याचिका दाखल झाल्या होत्या. याचिका दाखल झाल्यानंतर त्यावर सविस्तर सुनावणी सुरु झाली. यात वक्फ कायद्यातील दोन कलमांच्या अंमलबजावणीवर सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिलीय. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला महत्वपूर्ण निर्देश दिलेत.

सुप्रीम कोर्ट काय म्हणालं?

वक्फसंदर्भातील 2 कलमांना स्थगिती

वक्फ बोर्ड, परिषदेवर बिगर मुस्लिमांची नियुक्ती नको

वक्फ मालमत्ता अवैध घोषित करता येणार नाही

परिस्थिती जैसे थे ठेवा - कोर्ट

केंद्र सरकारनं 7 दिवसांत उत्तर द्यावं

दरम्यान,केंद्राच्या मनसुब्यांना सुरुंग लावत सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश दिलेत. यावेळी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. वक्फ कायद्यासंदर्भात पुढील सुनावणीवेळी न्यायालय अंतरिम आदेश देईल. मात्र विरोधकांनी यावरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय..

सभागृहात मध्यरात्रीपर्यंत चर्चा झालेलं वक्फ विधेयक सत्ताधाऱ्यांनी संख्याबळाच्या जोरावर पास केलं. त्यानंतर विरोधकांनी या कायद्याला कडाडून विरोध करत संविधानावर झालेला हा हल्ला असल्याचं म्हटलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानं दोन कलमांना स्थगिती दिल्यानं आता वक्फबाबत सुनावणींचं सत्र सुरुच राहणार,त्यामुळे 5 मेच्या सुनावणीत काय घडतं हेच पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : महाराष्ट्रात लपलाय 'हा' भव्य-सुंदर पुरातन किल्ला, येणाऱ्या सुट्टीत येथे ट्रिप प्लान करा

Maharashtra Live News Update: - नाशिकमध्ये थंडीची चाहूल, नाशिककरांनी आज अनुभवली धुक्याची चादर

Veen Doghatli Hi Tutena : समर-स्वानंदीचं लग्न मोडणार? 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा VIDEO

Pune : पुण्यात शिवसेना-भाजप संघर्ष? रासनेंचा धंगेकरांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, घरातील खोडकर मुलांना घेऊन पुढे जायचं

Akola Fire : अकोल्यात भल्या पहाटे अग्नितांडव, जेजे मॉलला लागली भीषण आग

SCROLL FOR NEXT