Supreme Court seeks response from Centre and Uttar Pradesh government over alleged irregularities in Ram Temple donations. saam tv
देश विदेश

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाची मोदी सरकारसह योगी सरकारला नोटीस, कोर्टात काय घडलं?

Supreme Court Notice On Ram Mandir Donation case: राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकारला नोटीस बजावली आहे. एसआयटीकडून अहवाल मागवत सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याचे आदेश देण्यात आले. पुढील सुनावणी सोमवारी होणार.

Omkar Sonawane

आयोध्या येथील राम जन्मभूमी मंदिरासाठी मिळालेल्या देणगीत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांवरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकारला नोटिस बजावली आहे. या प्रकरणी स्वतंत्र तसेच न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर उत्तर मागवण्यात आले आहे. तसेच कोर्टाने एसआयटीकडून चौकशीचा स्टेट्स रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत/ यासोबतच सीसीटीव्ही फुटेज देखील सेव्ह करून ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे.

सुप्रीम कोर्टाने काय म्हटले?

सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला नोटिस देत राम मंदिराच्या देणगीतील कथित घोटाळा प्रकरणाचे उत्तर मागितले आहे. मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती वी. मोहना यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीकडून चौकशीचा सविस्तर अहवाल मागवला आहे. कोर्टाने स्पष्ट केले की, उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीने आपला स्टेटस रिपोर्ट सादर करावा. तसेच एसआयटीची स्थापना कशी करण्यात आली, याची माहितीही अहवालात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय राम मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टलाही या याचिकांवर उत्तर देण्यास सांगितले आहे.

प्रकरण सुप्रीम कोर्टात कसे पोहोचले?

सोमवारी सुप्रीम कोर्टाने जनहित याचिकांच्या गटावर सुनावणी घेतली. या याचिकांमध्ये अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला मिळालेल्या देणगी आणि दान व्यवस्थापनात कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आतापर्यंत काय घडले?

या प्रकरणात वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी दाखल केलेली रिट याचिका, अजय कुमार राय व इतरांनी दाखल केलेली फौजदारी रिट याचिका तसेच आरजेडीचे खासदार सुधाकर सिंह यांनी दाखल केलेली स्वतंत्र याचिका यांचा समावेश आहे.

वकील नरेंद्र कुमार गोस्वामी काय म्हणाले?

यापूर्वी न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि शील नागू यांच्या खंडपीठासमोर या याचिकेचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, तात्काळ सुनावणीस कोर्टाने नकार दिला होता. याचिकाकर्त्यांनी आरोप गंभीर असल्याचे सांगत तातडीने सुनावणीची मागणी केली होती.

गोस्वामी यांच्या याचिकेत मंदिरातील देणगीशी संबंधित सर्व नोंदी आणि पुरावे जतन करण्याचे, तसेच देणगी व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता आणण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेनुसार, सार्वजनिक मंदिरात देवतेला अर्पण केलेले चढावे हे पवित्र संपत्ती असते आणि त्याचे व्यवस्थापन करणाऱ्यांवर पारदर्शकता, जबाबदारी आणि संरक्षणाची कायदेशीर जबाबदारी असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder: मोठा दिलासा! LPG सिलिंडर खरेदीचा नियम बदलणार, सरकारचा नवा प्लान काय?

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

Liver Cancer: लिव्हरमध्ये कॅन्सरची गाठ तयार होत असताना पायांमध्ये दिसतात ही 3 विचित्र लक्षणं

kolhapur : बारशाची तयारी सुरू असतानाच घरातून उठली अंत्ययात्रा, अवघ्या महिनाभराच्या चिमुकलीच्या आईचा संशयास्पद मृत्यू

Maharashtra News Live Update: - गोसेखुर्दच्या पाण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांचा अभियंत्याला घेराव

SCROLL FOR NEXT