Delhi Liquor Policy Case Arvind Kejriwal  ANI
देश विदेश

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

Supreme court grants bail to Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे १७७ दिवसांनंतर ते जेलच्या बाहेर येणार आहेत.

Priya More

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. १० लाखांच्या जात मुचलक्यावर केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १७७ दिवसांनंतर अरविंद केजरीवाल जेलच्या बाहेर येणार आहेत. कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी ईडीनंतर सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. ईडीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने आधीच जामीन मंजूर केला होता. आता सीबीआयशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात देखील त्यांना जामीन मिळाला आहे. याच प्रकरणात कोर्टाने मागच्या महिन्यात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर केला होता.

केजरीवाल यांनी सीबीआयने नोंदवलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक आणि जामीन नाकारण्याला आव्हान देणाऱ्या दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दोन्ही याचिकांवर निर्णय दिला. या खंडपीठात न्यायमूर्ती उज्ज्वल भुईंया यांचाही समावेश आहे. खंडपीठाने केजरीवाल यांच्या याचिकांवरील निर्णय ५ सप्टेंबर रोजी राखून ठेवला होता. आजच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.

कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सीबीआयने २६ जून रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. अटक झाल्यापासून अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात आहेत. आता त्यांना जामीन मिळाला आहे त्यामुळे तब्बल १७७ दिवसांनंतर ते तुरुंगाबाहेर येणार आहेत. हरयाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी जामीन मिळाल्यामुळे आम आदमी पक्षाला मोठा दिलासा मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT