Indian Coast Guard: भारताने सागरी सुरक्षेसाठी केला 1070 कोटी रुपयांचा करार, तटरक्षक दलाच्या ताफ्यात सामील होणार 14 जलद गस्ती नौका

India Defence Deal: भारतीय तटरक्षक दलाची क्षमता वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने बुधवारी मुंबईच्या माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडसोबत 1070 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली.
Indian Coast Guard
Indian Coast GuardSaam Tv
Published On

India Defence Deal:

भारतीय तटरक्षक दलाची क्षमता वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने बुधवारी मुंबईच्या माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडसोबत 1070 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. या अंतर्गत भारतीय तटरक्षक दलाला 14 जलद गस्ती जहाजे (FPV) मिळतील.

या संदर्भात संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक उच्च-तंत्रज्ञान प्रगत वैशिष्ट्ये आणि उपकरणांव्यतिरिक्त, हे FPV बहुउद्देशीय ड्रोन, वायरलेस कंट्रोल रिमोट वॉटर रेस्क्यू क्राफ्ट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने सुसज्ज असतील. या जहाजांमुळे तटरक्षक दल नव्या युगातील आव्हानांना अधिक चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकेल. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Indian Coast Guard
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना 2 वर्षांची होऊ शकते शिक्षा, पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल झाला गुन्हा; NCPCR अध्यक्षांचा दावा

या जहाजांच्या डिझाईनपासून ते बांधकामापर्यंतचे सर्व काम देशातच केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तटरक्षक दलाला ही जहाजे पाच वर्षांत मिळणार आहेत. ही जहाजे मच्छिमारांचे संरक्षण, देखरेख, नियंत्रण आणि पाळत ठेवण्यासाठी तटरक्षक दलाची क्षमता वाढवतील.  (Latest Marathi News)

मंत्रालयाचे म्हणणे आहे की आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अनुषंगाने हा करार स्वदेशी जहाज बांधणी क्षमता वाढवेल. त्यामुळे रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता हे सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे.

Indian Coast Guard
Ram Mandir: 'सध्या रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाऊ नका', पंतप्रधान मोदींचे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना आवाहन

संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, संरक्षण मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आणि एप्रिल 2023 मध्ये 98 शस्त्रे आणि प्रणालींच्या आयातीवर बंदी घातली होती. बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंमध्ये युद्ध वाहने, रडार, सेन्सर्स, लढाऊ विमानांसाठी उपकरणे, सागरी देखरेख करणारी विमाने, युद्धनौका, हेलिकॉप्टर आणि रणगाड्यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com