Supreme Court News Saamtv
देश विदेश

cyber crime : हद्द झाली.. सरन्यायाधीशांच्या नावाने मेसेज केला अन् ५०० रुपये मागितले, सर्वोच्च न्यायालयाने घेतली अॅक्शन

CJI DY Chandrachud : राजधानी दिल्लीमध्ये सरन्यायाधीश (Supreme Court) डीवाय चंद्रचूड यांच्या नावाने फसवणूक होत असल्याचं समोर आलेय.

Namdeo Kumbhar

Scam in Name of CJI : सायबर गुन्हेगारीची प्रकरणा दररोज कानावर येत असतात. पण दिल्लीमधील प्रकरणामुळे तुम्हीही चकीत व्हाल. राजधानी दिल्लीमध्ये सरन्यायाधीश (Supreme Court) डीवाय चंद्रचूड यांच्या नावाने फसवणूक होत असल्याचं समोर आलेय. सायबर गुन्हेगाराची हिमंत इतकी वाढली की देशाचे सरन्यायाधीश चंद्रचूड (CJI DY Chandrachud ) यांच्या नावाने पैसे लुटले आहेत. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने तात्काळ अॅक्शन घेतली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरु आहे.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावाने ५०० रुपये घेण्याचा प्रयत्न

फोनकॉल आणि मेसेज पाठवून फसवणूक केल्याची प्रकरणं आता रोजची झाली आहेत. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावाचा बनावट मेसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कॅब बूक करण्यासाठी पैसे मागितले जात आहेत. व्हायरल होणाऱ्या पोस्टनुसार सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने ५०० रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

काय मेसेज व्हायरल होतोय?

नमस्कार, मी सरन्यायाधीश आहे. माझी कॉलेजियमची महत्त्वाची बैठक आहे, पण मी कॅनॉट प्लेसमध्ये अडकलो आहे, तुम्ही कॅबसाठी 500 रुपये पाठवू शकता का? कोर्टात पोहोचल्यानंतर मी पैसे परत करेन.

cyber crime

आशा प्रकारचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टची सर्वोच्च न्यायालयाने आता दखल घेतली असून सरन्यायाधीशांच्या निर्देशानुसार सायबर फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून कारवाई -

सरन्यायाधीश यांच्या नावाने फसवणूक होत असल्याची व्हायरल पोस्ट समोर येताच सर्वोच्च न्यायालयाने स्वतः दखल घेतली आहे. सरन्यायाधीशांच्या निर्देशानुसार सायबर फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली. सायबर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

फसवणुकीच्या प्रकरणात वाढ -

सायबर फसवणुकीची आतापर्यंत अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. ज्यामध्ये गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या विविध डिजिटल पद्धतींचा शिकार झालेल्या लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेय. देशात या प्रकरणामध्ये दिवसांदिवस वाढ होत आहे. ३० मे रोजी आरबीआयने जारी केलेल्या वार्षिक अहवालानुसार बँकांद्वारे नोंदवलेल्या आर्थिक फसवणुकीच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात वार्षिक 166 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

SCROLL FOR NEXT