Supreme court on Women Reservation Law  Saam Tv
देश विदेश

Women Reservation Law : महिला आरक्षण कायद्याला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, सुनावणी करण्यासही दिला नकार

Supreme Court on Women Reservation Law : ३३ टक्के महिला आरक्षण कायद्याला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर कोर्टाने निर्णय दिला आहे.

Yash Shirke

Women Reservation Law : सुप्रीम कोर्टामध्ये ३३ टक्के महिला आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी (१० जानेवारी) नकार दिला. फक्त महिला आरक्षण कायद्यालाच नाही तर विधेयकाला आव्हान देणारी याचिका कोर्टाने निरर्थक ठरवली. दुसऱ्या याचिकेमध्ये या प्रकरणी हायकोर्टात जाण्यासह अन्य उपाय शोधण्याची मागणी केली होती. ही मागणी देखील कोर्टाने फेटाळली.

या प्रकरणावर बोलताना खंडपीठाने आपली बाजू स्पष्ट केली. यापूर्वीही संसदेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. परंतु त्यावर न्यायालयात अंमलबजावणी झाली नाही, मात्र यावेळी सीमांकन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या अटीवर त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे कोर्टाने सांगितले.

महिला आरक्षण कायद्याअंतर्गत लोकसभा, राज्याच्या विधानसभा आणि दिल्ली विधानसभा यांमध्ये महिलांसाठी एकूण जागांपैकी एक तृतीयांश जागा आरक्षित असतील. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागा ठेवण्यासंदर्भात हा नियम लागू होतो. याचा अर्थ लोकसभेमध्ये ५४३ जागांपैकी १८१ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. याला काही अपवाद आहेत. पॉण्डेचरीसारख्या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी जागा राखून ठेवल्या जाणार नाही.

जनगणनेनंतर लोकसंख्येची आकडेवारी जाहीर होईल आणि त्यानंतरचे हा कायदा लागू होणार असल्याचे म्हटले जात आहे. जनगणनेच्या आधारे महिलांसाठी राखीव जागा ठेवल्या जातील. या आरक्षणाचा कालावधी १५ वर्ष इतका असेल. सध्या लोकसभेमध्ये १३१ जागा एससी आणि एसटी उमेदवारांसाठी आरक्षित आहेत. महिला आरक्षण कायदा लागू झाल्यानंतर ४३ जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या जातील. याचा अर्थ महिलांच्या राखून ठेवलेल्या १८१ जागांपैकी १३८ जागांवर कोणत्याही जातीच्या महिला उमेदवार राहू शकतील. पण हे सर्व लोकसंख्येच्या आकडेवारीवर अवंलबून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT