अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

ayodhya flag hoisting ceremony : अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी 5000 महिला आरती करणार आहेत.
flag hoisting ceremony
ayodhya flag hoisting ceremony Saam tv
Published On
Summary

पंतप्रधान मोदी अयोध्येत फडकावणार १९० फूट धर्मध्वज

रोड शोमध्ये ५००० महिला आरतीसह सहभागी होणार

रामपथ ८ झोनमध्ये विभागून महिलांची मांडणी करण्यात आलीये

अयोध्यानगरीत राम मंदिरात मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्माचा झेंडा फडकवणार आहेत. या ध्वजारोहणाचा मुहूर्त ११.५५ ते १२.०० वाजेपर्यंत आहे. ५ मिनिटांत १९० फुटांच्या उंचीवर धर्माचा झेंडा फडकावण्यात येणार आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान मोदी हे साडेतीन तास अयोध्येत राहतील.

flag hoisting ceremony
BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

अयोध्येत ध्वजारोहणाचा मुहूर्त हा ११.५८ ते दुपारी १२.३० पर्यंत असणार आहे. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपवास करणार आहेत. अयोध्येत साकेत महाविद्यालय हॅलिपॅड ते राम मंदिरापर्यंत त्यांचा रोड शो असणार आहे. या रोड शोदरम्यान ५००० महिला सहभागी होणार आहेत.

महिला करणार पंतप्रधान मोदींची आरती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची तयारी जोरदार सुरु आहे. रामपथावर एक किलोमीटर मार्ग हा ८ झोनमध्ये विभागण्यात आला आहे. या झोनध्ये शेकडो महिला पारंपरिक वेशभूषेत थाळी, आरती,फुले, हार घेऊन उभ्या असतील.तर १५०० हून अधिक महिला झोन-८ तर १२०० महिला या झोन-४ मध्ये उभ्या राहतील.

flag hoisting ceremony
Nilesh lanke News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची गरज; मालेगाव प्रकरणावर खासदार नीलेश लंकेंची प्रतिक्रिया

वैदिक मंत्रोच्चार, घंटा, शंखनादच्या आवाजात पंतप्रधानांचे आभार मानले जातील. आरोग्य विभागाकडून अयोध्या धाममध्ये ७ ठिकाणी तात्पुरते मेडिकल कॅम्प असणार आहेत. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयात हायअलर्ट मोडवर ठेवण्यात आलं आहे. तसेच सर्व मेडिकल स्टाफच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

flag hoisting ceremony
Maharashtra Politics : काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी बडा नेता भाजपच्या गळाला

या कार्यक्रमासाठी रामपथ आणि विमानतळ ते अयोध्याधामपर्यंतचे रस्ते सजवण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत अयोध्या धामला पोहोचणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com