Wrestlers Protest Update  Saam Tv
देश विदेश

Wrestlers Protest Update : 'तक्रार दाखल होऊनही तपास पुढे का नाही?', सुप्रीम कोर्टाने दिल्ली पोलिसांनाच फटकारले

Latest News: ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी महिला कुस्तीपटूंनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

Priya More

Delhi News: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) आणि ऑलिम्पियन कुस्तीपटू यांच्यामधला वाद वाढतच चालला आहे. ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी महिला कुस्तीपटूंनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टाने थेट दिल्ली पोलिसांवरच ताशेरे ओढले आहेत. 'तक्रार दाखल होऊनही तपास पुढे का नाही?', अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने पोलिसांना केली आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात विनेश फोगटसह 7 महिला कुस्तीपटूंनी सोमवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरुन सुप्रीम कोर्टाने आज दिल्ली पोलिसांवरच ताशेरे ओढले आहेत. 'तक्रार दाखल होऊनही तपास पुढे का नाही?', अशी विचारणा कोर्टाने केली आहे. या प्रकरणावर आता येत्या शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या महिला कुस्तीपटूंनी 21 एप्रिल रोजी ब्रिजभूषण यांच्याविरोधात दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात लैंगिक छळाची तक्रार दिली होती. तक्रार दाखल करुनही अद्याप त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे या कुस्तीपटूंनी सोमवारी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. विनेश फोगटसह 7 महिला कुस्तीपटूंनी ही याचिका दाखल केली होती.

दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO ACT) गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या महिला कुस्तीपटूंनी केली आहे. या मागणीसाठी महिला कुस्तीपटू रविवारपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलनाला बसल्या आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी अनुभवी बॉक्सर एमसी मेरी कोम यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय देखरेख समितीची घोषणा केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : सोयाबीनच्या बीलापोटी मिळालेला चेक बँकेत भरल्यानंतर चोरीला; दुसऱ्याच खात्यावर वटला ४ लाखाचा चेक

Sshura Khan : खान कुटुंबाची सून शूरा आहे तरी कोण? वाचा Unknown Facts

Pune Traffic Protest : चाकणपेक्षा गुजरात बरा! वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उद्योजक रस्त्यावर उतरले

Maharashtra Live News Update: पुण्यात भाजप आणि शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता

'बॉयफ्रेंडशी ब्रेकअप कर अन् माझी हो..' प्राध्यपकानं तरूणीला घरी नेलं, 'नको तिथे स्पर्श' करत लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT