delhi crime news Saam Tv
देश विदेश

Delhi Crime News: चाललंय काय? दिल्ली विद्यापीठाच्या संकुलात विद्यार्थी एकमेकांना भिडले; एकाची धारदार शस्त्राने हत्या

Delhi Crime News: संकुलात झालेल्या हाणामारीत एका विद्यार्थ्यावर चाकू हल्ला करण्यात आला. या हल्यात या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

New Delhi: दिल्ली विद्यापीठाच्या दक्षिण संकुलातून एका हत्येचं प्रकरण समोर आलं आहे. विद्यापीठाच्या दक्षिण संकुलातील आर्यभट्ट कॉलेजचे विद्यार्थी एकमेकांना भिडले. संकुलात झालेल्या हाणामारीत एका विद्यार्थ्यावर चाकू हल्ला करण्यात आला. या हल्यात या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी रविवारी एका लेक्चरसाठी आर्यभट्ट कॉलेजला आले होते. कॉलेजच्या जवळच या विद्यार्थ्यांमध्ये मोठा वाद झाला. या वादात एका विद्यार्थ्यावर जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

निखिल चौहान असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. या घटनेने विद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

विद्यार्थ्याची हत्या का करण्यात आली?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने निखिलच्या प्रियसीला छेडलं होतं. त्यानंतर आज दुपारी कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या गेटबाहेर निखिलला गाठलं. त्यानंतर त्याच्या छातीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यानंतर निखिलला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान निखिलचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

दिल्लीत २४ तासांत तीन हत्येच्या घटना

दरम्यान, आज दिवसभरात दिल्लीतील उच्चभ्रू दक्षिण दिल्लीत ३ हत्या झाल्याच्या घटना घडल्या. सकाळी दोन बहिणींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तर निखिलची विद्यापीठाच्या संकुलात चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या हत्येच्या घटनेने दिल्लीत खळबळ उडाली आहे. हत्येच्या घटनेवरून नागरिकांकडून दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक संजय राऊत यांच्या भेटीला

Vitamin E Capsule Benefits: व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे 5 आश्चर्यकारक फायदे, जे वाचून थक्क व्हाल

Gold Rate Today: दिवाळी पाडव्याला सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा १८- २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर

Clothes Ironing Tips: इस्त्री करूनही कपड्यांवरच्या सुरकुत्या जात नाहीत? हे 5 सोपे उपाय करून बघाच

Jaggery Vs Sugar In Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी गूळ साखरेपेक्षा चांगला आहे का? रक्तातील साखर वाढू नये म्हणून गुळाचे सेवन किती करावे?

SCROLL FOR NEXT