Jalgaon Crime News
Jalgaon Crime NewsSaam tv

Jalgaon Crime News: जुन्‍या भांडणावरून वाद; मोटारसायकलवर डोके आपटून केली हत्‍या

जुन्‍या भांडणावरून वाद; मोटारसायकलवर डोके आपटून केली हत्‍या
Published on

भुसावळ (जळगाव) : भुसावळ तालुक्यातील फेकरी गावातील मंगल शांताराम शेळके व राहुल पाडाळे यांचा जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांमध्ये (Crime News) वाद झाला. यामध्ये मंगल शेळके यांचे मोटरसायकलवर डोके आपटल्याने जागीच मृत्‍यू झाला. संशयित आरोपीस रात्री ताब्यात घेऊन (Bhusawal) अटक करण्यात आली आहे. (Maharashtra News)

Jalgaon Crime News
Latur News: प्रेम प्रकरणाचा दुर्दैवी शेवट; नाका तोंडात मिरची पावडर टाकून बेदम मारहाण, तरूणाचा उपचारादरम्यान मृत्‍यू

भुसावळ तालुक्‍यातील फेकरी उड्डाण पुलाजवळ साकरी गावाकडील सर्व्हिस रोडवर सदर घटना घडली. जुन्या भांडणावरून दोघांमध्ये आपसात वाद झाले. वाद विकोपाला गेल्याने मद्य सेवन करून आलेला संशयित आरोपी राहुल पाडाळे याने मंगल शेळके यांचे डोके मोटरसायकलवर आपटले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तालुका पोलीस स्टेशनला आकाश शांताराम शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalgaon Crime News
Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात नवीन १७ बँकांना मान्यता

पाच दिवसांची पोलिस कोठडी

संशयित आरोपीस शनिवारी (१७ जून) रोजी रात्री साडेआठच्‍या सुमारास अटक करण्यात आली. आरोपीस आज (१८ जून) न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांचा (Police) पोलीस कोठडी सुनविली आहे. संशयित आरोपीने या आधीही मयत मंगल शेळके यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com