Latur News
Latur NewsSaam tv

Latur News: प्रेम प्रकरणाचा दुर्दैवी शेवट; नाका तोंडात मिरची पावडर टाकून बेदम मारहाण, तरूणाचा उपचारादरम्यान मृत्‍यू

प्रेम प्रकरणाचा दुर्दैवी शेवट; नाका तोंडात मिरची पावडर टाकून बेदम मारहाण, तरूणाचा उपचारादरम्यान मृत्‍यू
Published on

संदीप भोसले

लातूर : प्रेम प्रकरणातून तरूणाला जीव गमवावा लागला आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा गावातील २२ वर्षीय बळीराम नेताजी मगर या तरूणाचा शनिवारी (१७ जून) उपचारादरम्‍यान दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. त्‍याला मुलीच्‍या परिवाराकडून मारहाण झाली होती. (Tajya Batmya)

Latur News
Dhule Crime News: आईच्या उत्तर कार्याच्या खर्चावरून वाद; मारहाणीत जखमीचा मृत्यू

बळीराम मगर या तरुणाचे गावातील एका मुलीवर प्रेम (Love Afair) होते. याचीच कुणकुण मुलीच्या घरच्यांना लागली. मात्र या विषयाची विचारणा करण्यासाठी गेल्या ३ जूनला घरी बोलावून त्यास बेदम मारहाण करण्यात आली.या वेळी त्याच्या नाकातोंडात लाल मिरची पावडर टाकण्यात आली होती. मारहाण झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी भादा पोलीस ठाण्यात सदरील घटनेची तक्रार करण्यास आली होती. भादा पोलिसांनी तत्काळ आरोपी अटक केले होते. तीन पुरुष व दोन महिला अशा पाच आरोपी यांचा समावेश आहे.

Latur News
Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात नवीन १७ बँकांना मान्यता

१५ दिवस उपचार

जबर मार लागल्यामुळे बळीराम मगर याला लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तोंडावाटे छातीत मोठ्या प्रमाणात मिरची पावडर गेल्यामुळे त्याच्या श्वसनास त्रास होत होता. यामुळे मागील १५ दिवसांपासून बळीराम मगर याच्यावर उपचार सुरू होते. दरम्‍यान शनिवारी रात्री त्याचा मृत्‍यू झाला. बळीराम मगर याचा मृत्यू झाल्याची वार्ता गावात मिळताच गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com