Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात नवीन १७ बँकांना मान्यता

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात नवीन १७ बँकांना मान्यता
Nandurbar News Bank
Nandurbar News BankSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदूरबार : सातपुड्यात वसलेल्‍या नंदुरबार जिल्‍ह्यात दळणवळणापासून ते नेटवर्कपर्यंतच्‍या समस्‍या आहेत. अशा बँकांचे (Bank) झालेले ऑनलाईन व्‍यवहारांमुळे शासनाकडून मिळत असलेल्‍या लाभाचा फायदा लाभार्थीला मिळत नाही. हा लाभ मिळावा (Nandurbar) याकरीता जिल्‍ह्यात १७ नवीन बँकांना मान्‍यता मिळाली आहे. (Live Marathi News)

Nandurbar News Bank
Nandurbar News: पंधरा तपासणी नाक्‍यांवर २४ तास पोलिसांचा पहारा; आंतरराज्य चेक पोस्ट, शहराच्या प्रवेश ठिकाणावर वाहनांची होणार तपासणी

नंदूरबार जिल्हा सातपुड्याच्या दुर्गम भागात वसला आहे. त्यामुळे याठिकाणी नेटवर्कची खूप मोठी समस्या आहे. परंतु शासनाने अनेक योजना आणि योजनांपासून मिळणाऱ्या अनुदान हे ऑनलाइन सुरू केल्या आहेत. तर विद्यार्थ्यांसाठी डीबीटी देखील ऑनलाईन असल्याने दुर्गम भागातील लोकांना योजनांचे अनुदानपासून आणि डीबीटीपासून वंचित राहावे लागत होते. यासाठी केंद्र सरकारने नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात नवीन १७ बँकेला मान्यता दिली असून लवकरच या बँका कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी सातपुड्याच्या दुर्गम भागातील आदिवासी लोकांना बँकेमुळे योजनांचे अनुदान सहज मिळणार आहे.

Nandurbar News Bank
Dhule Crime News: आईच्या उत्तर कार्याच्या खर्चावरून वाद; मारहाणीत जखमीचा मृत्यू

शासनाने सर्वे व्यवहार ऑनलाइन केले आहेत. तर शासनाकडून पैसे द्वारा मिळणारे लाभ देखील बँकेत येत असतात. तर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या डीबीटी देखील बँकेत येते. त्यामुळे शेतकरी सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना याच्या चांगला फायदा होणार आहे अशी माहिती खासदार डॉ. हिना गावित यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com