Isro Ram Setu Saam Tv
देश विदेश

Isro Ram Setu : ISRO च्या वैज्ञानिकांना मोठं यश; समुद्राखालील रामसेतूचा तयार केला नकाशा

Story Ram Setu Isro Big Success : सध्यो सर्वत्र रामसेतू या विषयाची सर्वत्र चर्चा होतेय मात्र ही बातमी संपूर्ण आनंदाची मानता येईल. कारण इस्रोच्या शास्त्रज्ञांनी त्याचा तपशीलवार नकाशा तयार केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध आणि पवित्र अशा रामायणातील रामसेतूचा बद्दल आपल्यापैंकी प्रत्येकाने लहानपासून अनेक गोष्टी ऐकल्या आहेत.माता सिता यांना प्रभू रामचंद्रांनी रावणाच्या कैदेतून परत आणण्यासाठी वानर सेनेच्या साहाय्याने रामेश्वरम ते श्रीलंकेतील मन्नार बेटापर्यंत सेतू बांधला होता. परंतू आता याच राम सेतूसंबंधित इस्रोच्या शास्त्रज्ञांना एक मोठे यश मिळाले आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी त्याचा तपशीलवार नकाशा तयार केलाय. नकाशा तयार करण्यासाठी इस्रोने अमेरिकन स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूट नासाच्या काही उपग्रहांचा डेटा वापरला आहे.

इस्रोच्या वैज्ञानिकांनी ICESat-2 च्या २०१८ ऑक्टोबर ते साधारण ऑक्टोबर २०२३ पर्यंतच्या सर्व डेटाचा वापर करुन जलमग्न असलेल्या संपूर्ण सेतूच्या लांबीचा साधारण १० मीटर रिझोल्यूशनचा मॅप तयार केला आहे. या तयार केलेल्या नकाशामधून धनुषकोडीपासून साधारण तलाईमन्नारपर्यंतच्या पुलाची माहिती मिळते. परंतू यात सेतूचा ९९.९८ टक्के भाग संपूर्ण पाण्यात बुडालेला आहे. सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमधये प्रकाशित केलेल्या एका अभ्यसानुसार,इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अमेरिकेच्या उपग्रहासह सुसज्ज लेझर असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करुन पाण्यात बुडालेल्या सेतूचा रिझोल्यूशन मॅप(Map) तयार केला आहे.

गिरीबाबू दंडबथुला यांच्या संपूर्ण नेतृत्वाखाली रिसर्च टीमने ११ नॅरो चॅनल (channel)शोधले आहे. जे मन्नारचे आखात आणि पाल्कच्या असलेल्या सामुद्रधुनी दरम्यानच्या पाण्याच्या प्रवाहात महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

इस्रोच्या शास्त्रज्ञांना सांगितले की, या पुलाचा साधारण ९९.९८ टक्के हिस्सा पाण्यात बुडालेला आहे. यामुळे तो भाग जहाजाच्या सहाय्याने सर्व्हे करणे सध्या शक्य नव्हते. रामेश्वरम येथील मंदिरांच्या शिलालेखांवरुन समजते की, तो पुल साधारण १४८० पर्यंत समुद्रातील पाण्यावर होता. मात्र काही वर्षापूर्वी आलेल्या एका महाकाय चक्रीवादळ (Hurricane)आल्याने तो बुडाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WPL 2025 Retention: महिला प्रीमियर लीगची रिटेन्शन लिस्ट जाहीर,कोणत्या संघांनी कोणत्या खेळाडूंना केलं बाहेर?

Maharashtra Election: मराठा समाजाचा फेव्हरेट पक्ष कोणता? मराठा समाज कुणाचं गणित बिघडवणार?

Assembly Election: नवाब मलिकांच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात; भाजपच्या विरोधाला दादांचा ठेंगा

Worli Politics: वरळीत फोडाफोडी, खोक्याचं राजकारण सुरू झालं; मिलिंद देवरा यांची टीका

Suniel Shetty Injury : सुनील शेट्टी जखमी; अॅक्शन सीन करताना दुर्घटना, सेटवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT