Cyclone Remal : रेमल चक्रीवादळ बांग्लादेशच्या किनारपट्टीला धडकलं; बंगालमध्ये जोरदार वारा अन् तुफान पाऊस, पाहा VIDEO

Cyclone Remal Update : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रेमल चक्रीवादळाने बांग्लादेश किनारपट्टीला तडाखा दिला. रविवारी रात्री चक्रीवादळ धडकल्याने अनेक भागात तुफान पाऊस झाला.
रेमल चक्रीवादळ बांग्लादेशच्या किनारपट्टीला धडकलं
Cyclone Remal UpdateANI

बंगालच्या उपसागरात तयार झालेले रेमल चक्रीवादळ रविवारी रात्री बांग्लादेश किनारपट्टीला धडकले. त्यामुळे अनेक भागात विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला. वाऱ्याचा वेग ताशी १२० किमी असल्याने काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. तसेच अनेक ठिकाणी लाईटचे खांब देखील पडले.

रेमल चक्रीवादळ बांग्लादेशच्या किनारपट्टीला धडकलं
Remal Cyclone: रेमल चक्रीवादळचं थैमान; IMD कडून रेड अलर्ट, एअर इंडियाने रद्द केली ३००हून अधिक उड्डाणे

खबरदारी म्हणून किनारपट्टी भागातील जवळपास २ लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले. यातील बहुतांश लोक दक्षिण २४ परागना जिल्ह्यातील आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ आता कमकुवत झाले आहे.

केंद्र आणि राज्य सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. या वादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर आलेले तीव्र चक्रीवादळ १३ किमी प्रतितास वेगाने ६ तासांत जवळजवळ उत्तरेकडे सरकले.

या चक्रीवादळाने पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि खेपुपारा दरम्यान बांगलादेश आणि किनारपट्टी लगतच्या सीमा ओलांडल्या. या भीषण चक्रीवादळाच्या काळात वाऱ्याचा वेग ताशी ११० ते १२० इतका होता. नंतर तो ताशी १३५ किमीपर्यंत वाढला.

या चक्रीवादळाचा मोठा फटका पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यांना बसला. कोलकत्त्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने झाडेही उन्मळून पडली. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, २७ मे २०२४ च्या सकाळपर्यंत रेमाल हळूहळू चक्रीवादळात कमकुवत होईल.

मात्र, पुढील २४ तास बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारीपट्टी भागात पाऊस आणि वारे सुरूच राहील.सोमवारी पहाटेच्या सुमारास या भागात तुफान पावसाला सुरुवात होईल. दुसरीकडे या चक्रीवादळाचा मान्सूनवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com