France: इंग्लिश चॅनल ओलांडताना मोठी दुर्घटना! पाच जणांचा मृत्यू; किनाऱ्यावर सापडले मृतदेह

English Channel Accident: या जहाजात एकूण ११२ लोक होते. ज्यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून इतर लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच काही जण बेपत्ताही झालेत. ज्यांचा शोध सुरू आहे.
 English Channel Accident:
English Channel Accident: Saamtv

उत्तर फ्रान्समधून धोकादायक इंग्लिश चॅनेल ओलांडण्याच्या प्रयत्नात बोट उलटल्याची बातमी समोर आली आहे. ज्यात एका मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला. इंग्लिश चॅनेल ओलांडण्याच्या प्रयत्नात ही मोठी दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ब्रिटीश संसदेने रवांडामध्ये स्थलांतरितांना पाठवण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली होती. त्यानुसार चॅनेल ओलांडण्यास परवानगी दिल्यानंतर काही तासांतच ही बोट अपघाताची दुर्दैवी घटना घडली.

फ्रेंच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूच्या किनाऱ्यावर आदळल्यानंतर, बोट पुन्हा समुद्रात गेली. ज्यानंतर ही दुर्घटना घडली. या जहाजात एकूण ११२ लोक होते. ज्यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून इतर लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच काही जण बेपत्ताही झालेत. ज्यांचा शोध सुरू आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे

 English Channel Accident:
Police Action: उत्तर महाराष्ट्रातून २२० गुंड तडीपार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई

दरम्यान, जिबूतीच्या किनाऱ्यावर ७७ जणांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने २१ स्थलांतरितांचा मृत्यू झाला आणि २३ जण बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे. ही दोन आठवड्यांतील दुसरी घटना आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतर संस्थेने मंगळवारी सांगितले. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की बोटीतील प्रवाशांमध्ये मुलांचा समावेश आहे.

 English Channel Accident:
Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे १० आमदार फुटणार; नारायण राणेंचा मोठा दावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com