Police Action: उत्तर महाराष्ट्रातून २२० गुंड तडीपार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई

Maharashtra Police Action: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक ग्रामीण, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
Maharashtra  Police Action
Maharashtra Police ActionSaam TV

Lok Sabha Election Police Action

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून, निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनांवर भर दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक ग्रामीण, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Maharashtra  Police Action
Bhandara Accident: भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर

उत्तर महाराष्ट्रातून तब्बल २२० सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी तडीपार केलं आहे. तर ४३ गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत स्थान बद्धतेची कारवाई केली आहे. याशिवाय तब्बल २१,८६१ गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक ६९ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलं आहे. तर ८ गुन्हेगारांवर MPDA आणि तब्बल १०,९९१ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. जळगाव, नगर आणि मालेगावमधील ३ टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांनी धास्ती घेतली असून काहीजण लपून बसले आहेत. या गुन्हेगारांचा शोध घेण्याचे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच ज्या व्यक्तींकडे शस्त्र परवाना आहे, त्यांना निवडणुकांआधी शस्त्र जमा करण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे.

उत्तर महाराष्ट्रातील गुंडांवर पोलिसांची कारवाई

जिल्हा तडीपार MPDA प्रतिबंधक कारवाई

  • अहमदनगर ६९ ०८ १०,९९१

  • जळगाव ५० २६ ४,०५३

  • नाशिक ग्रामीण २६ ०९ १,६२१

  • धुळे ५४ - १,८४६

  • नंदुरबार २१ - ३,३५०

Maharashtra  Police Action
Nandurbar Accident: दोन दुचाकींची समोरासमोर धडक; बाइकचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com