कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
दहावी-बारावी पास करण्यासाठी किमान ३३ टक्के आवश्यक
याआधी होती ३५ टक्क्यांची मर्यादा
कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक सरकारने शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा २०२५-२६ पासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी उत्तीर्ण होण्याच्या किमान गुणांमध्ये बदल केले आहे. आता किमान गुणांची मर्यादा ३३ टक्के निश्चित करण्यात आली आहे. एसएसएलसी आणि पीयुसी (SSLC and PUC Exams) म्हणजे दहावी बारावीसाठी आता परीक्षा पास करण्याची मर्यादा ३३ टक्के निश्चित करण्यात आली आहे. याआधी ही मर्यादा ३५ टक्के होती.
शालेय शिक्षण मंत्री एस.मधू बंगारप्पा यांनी याबाबत माहिती दिली आहे. आता नवीन निकषानुसार, दहावी परीक्षेत किमान ३३ टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. किमान ३३ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित केले जाणार आहे. बारावीच्या परीक्षेसाठीही हाच नियम लागू होणार आहे.
प्रत्येक विषयात किमान ३० गुण आणि सरासरी ३३ गुण मिळवणे आवश्यक आहे.६०० पेकी एकूण १९८ गुण मिळवणे अनिवार्य आहे. हा नियम नवीन विद्यार्थी, रिपीटर आणि खाजगी उमेदवारांनाही लागू असणार आहे.
शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, सीबीएसई आणि शेजारील राज्यांमध्ये ३३ टक्के उत्तीर्णतेचा नियम आहे. त्याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि राष्ट्रीय निकषांमध्ये सुसंगतपणा राखवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्य प्रशासकीय आयोगानेही उत्तीर्ण गुणांचे प्रमाण कमी होण्यासाठी शिफारस केली होती. याबाबत सार्वजनिक सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता हा ३३ गुणांचा निकष स्विकारला आहे.
दरवर्षी तीन परीक्षा घेतल्या जातात. यामध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी वेब कास्टिंग व्यवस्था केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले जाणार नाहीत.राज्यातील शाळांमधील शिक्षकांनी शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा केली आहे.यामुळे परीक्षेचा निकाल चांगला लागला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.