Karnatak Mangaluru Bus Accident : दोन भरधाव बस एकमेकांना धडकल्या; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद,१४ विद्यार्थी गंभीर जखमी

Karnatak Mangaluru News : कर्नाटकातील मंगळुरमधील चेल्यारू येथे दोन खाजगी बसमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात १४ विद्यार्थी जखमी झाले. अपघाताचा व्हिडिओ डॅशकॅममध्ये कैद झाला असून पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Karnatak Mangaluru Bus Accident
bus accident saam tv
Published On

कर्नाटकातील मंगळुरमध्ये भीषण अपघात झाला. कर्नाटकातील मंगळुरमध्ये चेल्यारू भागात बुधवारी सकाळच्या सुमारास दोन खाजगी बसची समोरासमोर टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की यामध्ये १४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे हा अपघात सकाळी १० च्या सुमारास घडला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक खाजगी बस प्रवाशांना घेऊन चेरल्याला जात होती. सकाळची वेळ असल्याने या बसमध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि सामान्य प्रवासी होते. बस चेल्यारूजवळ एका वळणात आल्यावर बाजपेहून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या बसने तिला जोरदार धडक दिली.

Karnatak Mangaluru Bus Accident
Karanatak Election मध्ये सत्ता नक्की कोणाची Congress की BJP?

या धडकेत प्रवाशांसह कंडक्टर आणि चालक देखील गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींची प्रकृती आता स्थिर असून धोक्याबाहेर आहे.

Karnatak Mangaluru Bus Accident
Karnataka Election Result: कॉंग्रेसच्या गोटात हालचालींना वेग! दगाफटका टाळण्यासाठी मास्टरप्लॅन तयार; विजयी आमदारांना...

गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील सर्व खाजगी शहरी आणि एक्सप्रेस बसेसमध्ये डॅशबोर्ड कॅमेरे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत . अपघातांनंतर बस मालक पोलिसांना फुटेज देत आहेत , ज्यामुळे तपास सोपा होत आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्ता सुरक्षा आणि बसेसच्या वेगवान गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चांगली गोष्ट म्हणजे सर्व जखमी धोक्याबाहेर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com