Karnataka Election Result: कॉंग्रेसच्या गोटात हालचालींना वेग! दगाफटका टाळण्यासाठी मास्टरप्लॅन तयार; विजयी आमदारांना...

Karnataka VidhanSabha Election Result: बहुमत मिळाले तरी कर्नाटकात ऑपरेशन लोटस होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
Karnataka Election Result
Karnataka Election ResultSaamtv
Published On

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजपला काँग्रेसने धोबीपछाड दिलं आहे. काँग्रेसला पहिल्या कलामध्ये बहुमत मिळालं आहे. काँग्रेसने 115 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला अवघ्या 79 जागांवर आघाडी मिळाली आहे.

विजयाकडे वाटचाल सुरू असतानाच कॉँग्रेसच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. बहुमत मिळाले तरी कर्नाटकात ऑपरेशन लोटस होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळेच कर्नाटक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के शिवकुमार यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

Karnataka Election Result
Karnataka Election Result 2023: आम्ही राहुल गांधींकडे पंतप्रधान म्हणून पाहतोय; कर्नाटकात काँग्रेसने मुसंडी मारताच बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

याबाबत अधिक माहिती अशी की, अत्‍यंत चुरशीने होत असलेल्या कर्नाटक निवडणुकीमध्ये काँग्रेसने (Congress) बहुमताकडे वाटचाल सुरु केली आहे. मतमोजणीच्या पहिल्या दीड तासांच्या कलांमध्ये काँग्रेसने 131 जागांवर आघाडी मिळवली आहे, तर प्रतिस्पर्धी भाजपने 73 जागांवर आघाडी मिळाली आहे. (Karnataka Election Result)

राज्यात काँग्रेसला 150 पेक्षा कमी जागा मिळाल्यास भाजप काँग्रेसचे आमि जेडीएसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे राज्यात काँग्रेसवर संकट येऊ शकते. त्यामुळेच घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेसने सर्व आमदारांना बंगळुरूला बोलावले आहे. तसेच यासाठी हैद्राबादमध्ये एक रिसॉर्टही बुक करण्यात आल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार आणि खरगे यांच्यावर आमदार सांभाळण्याची जबाबदारी आहे. हे दोन्ही नेते उमेदवारांशी चर्चा करत आहेत.

Karnataka Election Result
Cyber Crime: सावधान! माजी पोलीस आयुक्तांच्या नावे मॅसेज आल्यास काळजी घ्या; हेमंत नगराळेंनी दिली धक्कादायक माहिती

२०१८ मध्ये पडले होते सरकार...

2018मध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं नव्हते. भाजपला लोकसभा निवडणुकीत 25 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे केंद्रात सरकार बनवण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला होता. त्यासाठी भाजपने काँग्रेस आणि जेडीएसचे मिळून 17 आमदार फोडले होते. त्यानंतर राज्यात भाजपचं सरकार आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com