Karnataka Election Result 2023: आम्ही राहुल गांधींकडे पंतप्रधान म्हणून पाहतोय; कर्नाटकात काँग्रेसने मुसंडी मारताच बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

Political News: जनतेनं भाजपला वाळीत टाकल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
Karnataka Election Result 2023
Karnataka Election Result 2023Saam TV

नवनीत तापडिया

Nana Patole: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. समोर आलेल्या एक्झीट पोलनंतर आता काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसत आहे. अशात भाजपच्या आकडेवारीवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. जनतेनं भाजपला वाळीत टाकल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच आम्ही राहुल गांधींकडे पंतप्रधान म्हणून पाहतोय, असं मत पटोलेंनी व्यक्त केलं आहे.

(Latest Marathi News)

छत्रपती संभाजीनगर येथून माध्यमांशी संवाद साधताना पटोले बोलत होते. "मागच्या वर्षी सुध्दा आम्हाला काठावर बहुमत दिलं होतं. भाजपचा खरा चेहरा भ्रष्टाचारी आहे हे जनतेच्या समोर आलं आहे. लिंगायत समाजाच्या जोरावर निवडून आले आणि त्यांना वाळीत टाकण्याचं काम भाजपने केलं. त्यामुळे त्यांना तिथल्या जनतेने वाळीत टाकलं आहे.", अशी टीका नाना पटोले यांनी केली.

Karnataka Election Result 2023
Political News: शिंदे-फडणवीस सरकारवर या निकालाचा परिणाम होणार नाही; राज्याच्या माजी मंत्र्यांचे मत

राहुल गांधीकडे आम्ही पंतप्रधान म्हणून पाहतोय

कर्नाटकात (Karnataka) 124 च्या वर जागा सुशिक्षित मतदारांनी काँग्रेसला दिल्या आहेत. याहुनही जास्त जागा येतील. राहुल गांधीवर खोटा आरोप लावून त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्याचे पाप भाजपने केले. त्यांना आता बेघर केलं आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मानण्याची देशात सुरुवात झाली आहे. राहुल गांधीकडे आम्ही पंतप्रधान म्हणून पाहतोय. राहुल गांधी शिकलेले आहेत आताचे पंतप्रधान किती शिकले मला माहित नाही, असं मत पटोलेंनी व्यक्त केलं.

अंगावर आलं की आम्ही शिंगावर घेतो

अंगावर आलं की आम्ही शिंगावर घेतो. मात्र आता कोणी आमच्या अंगावर येत नाही. सकाळच्या 9 च्या लाईव्हमध्ये आमचा विषय येत नाही, असं म्हणत नाना पटोलेंनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. जो कोणी भाजपाविरोधात ताकतीने लढायला तयार आहे त्यांना आम्ही सोबत घेऊन जाऊ, अशी आमची भूमिका असल्याचं ते म्हणाले.

Karnataka Election Result 2023
Karnatak निवडणूकीवरून Sharad Pawar यांनी BJP ला सुणावलं

काँग्रेससाठी (Congress) सत्ता दुय्यम विषय आहे. आधी देश आणि संविधान हे आमचे प्रथम विषय आहेत. मात्र भाजपसाठी सत्ता प्रथम विषय आहे. उद्या काँग्रेसचं सरकार आलं तर भ्रष्टाचार संपवायला वेळ लागणार नाही, कारण सर्व भ्रष्टाचारी भाजपच्या पिंजऱ्यात अडकले आहेत, असे आरोप नाना पटोलेंनी (Nana Patole) भाजपवर केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com