Spicejet flight x
देश विदेश

Air India, IndiGo नंतर आता Spicejetच्या विमानात तांत्रिक बिघाड, हैदराबादहून आकाशात झेपावलं, १० मिनिटं हवेत थांबलं अन्...

Technical Issue in Spicejet Plane: विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे पाहायला मिळाले. हे विमान हैदराबादहून तिरुपलीला जाण्यासाठी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन झेपावले होते.

Yash Shirke

तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन तिरुपतीला जाणारे स्पाइसजेटचे विमान टेकऑफ घेतल्यानंतर विमानतळावर पुन्हा परतले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे म्हटले जात आहे. Q400 हे विमान गुरुवारी (१९ जून) सकाळी ६.१० वाजता निघणार होते. पण विमानाने हैदराबादहून सकाळी ६.१९ वाजता उड्डाण केले. हे विमान सकाळी ७.४० वाजता तिरुपती येथे उतरणार होते. पण टेकऑफनंतर लगेचच ते राजीव गांधी विमानतळावर परतले. विमानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्पाइसजेटने या घटनेवर लगेचच निवदेन जारी केले आहे. विमानात एएफटी बॅगेज डोअर लाइट अधूनमधून चमकत होती. तेव्हा खबरदारी म्हणून विमान पुन्हा विमानतळावर परतले, असे स्पाइसजेटने सादर केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी स्पाइसजेटच्या एका विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे विमान बराच वेळ विमानतळावर थांबले होते.

'१९ जून रोजी हैदराबाद-तिरुपती उड्डाण करणाऱ्या स्पाइसजेटच्या Q400 विमानात उड्डाण केल्यानंतर एएफफटी बॅगेज डोअर लाईट अधूनमधून चमकू लागल्या. खबरदारी म्हणून वैमानिकांनी हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतला. विमान सुरक्षितपणे विमानतळावर उतरले. तिरुपतीसाठी पुढील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे', असे स्पाइसजेटने म्हटले आहे.

मागील काही दिवसांपासून विमानांमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. दिल्ली-लेह इंडिगो फ्लाइट दोन तासांहून अधिक काळ हवेत राहिल्यानंतर विमानतळावर परतले होते. एअर इंडियाचे विमान तांत्रिक बिघाड झाल्याने टेकऑफपूर्वी रद्द करण्यात आले होते. या अशा घटना समोर येत असल्याने भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lower Cancer Risk Drink: 'ही' तीन पेय महिन्यातून एकदा प्यायलात तर कायमचा ठळेल कॅन्सरचा धोका

Raigad : रायगडमध्ये मुसळधार पाऊस; शाळा कॉलेजला सुट्टी | VIDEO

डिजिटल पत्रकारितेत सकाळची आघाडी कायम; दर्जेदार बातम्यांचा प्रभावी ठसा

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै? वाचा कधीपर्यंत भरता येणार

SCROLL FOR NEXT