दादांच्या विमान अपघातावरून संशय बळावला? अपघाताच्या अहवालातील झाडावरून वाद?

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला... मात्र या अहवालातील एका दाव्यावर बारामतीतील स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतलाय... त्यामुळे विमान अपघातावरून स्थानिकांनी काय म्हटलयं... स्थानिकाचा प्राथमिक अहवालावर आक्षेप का आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Locals raise questions after AAIB preliminary report claims Ajit Pawar’s aircraft crashed following a tree collision near Baramati airport.
Locals raise questions after AAIB preliminary report claims Ajit Pawar’s aircraft crashed following a tree collision near Baramati airport.Saam Tv
Published On

अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तब्बल महिनाभरानंतर अखेर एएआयबीचा प्राथमिक अहवाल समोर आलाय... या 22 पानी अहवालात विमान अपघातामागील प्राथमिक निष्कर्ष मांडण्यात आलेत... यात DGCA च्या रिपोर्टनुसार झाडाला धडकल्याने अजित पवारांचं विमान कोसळल्याचं नमुद करण्यात आलंय.. पण यावरुन आता वेगळाच वाद निर्माण झालाय... स्थानिकांनी अपघातस्थळी कुठलंच मोठं झाड नसल्याचा खुलासा करत... अपघातावरून संशय व्यक्त केलाय...

दरम्यान बारामती विमानतळ महाराष्ट्राच्या "बारामती जिल्हा"त असल्याचं अहवालात नमुद करण्यात आल्याने आमदार रोहित पवारांनी अहवालावर प्रश्न उपस्थित केलाय.. बारामती तालुक्याला जिल्हा म्हटल्यानं AAIB ने हा अहवाल किती गांभीर्याने बनवलाय... हे लक्षात येईल, असं म्हणत रोहित पवारांनी अहवालातील चुकीवर बोट ठेवलयं...

AAIBच्या अहवालात नेमकं काय?

ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब

रॉ डेटा डाऊनलोड करण्यात आला

विमान झाडावर आदळून खाली कोसळलं

रनवेच्या सुरुवातीला 50 मीटर बाहेर विमान कोसळलं

विमान कोसळलं तेव्हा 2 हजार मीटर दृष्यमानता

तांत्रिक बिघाडाचा थेट पुरावा नाही

पायलट दारू पिल्याचा थेट पुरावा नाही

अहवालात झाड आणि भौगोलिक चुकांमुळें विमान अपघात झाल्याचं सांगण्यात आलंय... त्यामुळे या संपूर्ण तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातयं... हा प्राथमिक अहवाल राजकीय दबावामुळे घाईघाईत प्रसिद्ध करण्यात आलाय का? आणि अंतिम अहवालानंतर तरी दादांच्या अपघाताचं गूढ उकलणार? की कायम राहणार? याकडे राज्याचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com