खामेनीची हत्या, पाकिस्तान पेटला, पाकमधील अमेरिकन दूतावासात अग्नितांडव

9 Dead, Dozens Injured As Karachi Americans Embassy Attacked: खामेनींच्या हत्येनं पाकिस्तान पेटलाय... पाकमधील अमेरिकन दूतावासाबाहेर आंदोलकांनी कसं रान उठवलंय... आणि खामेनींच्या हत्येची ध़ग पाकिस्तानपर्यंत का पोहचलीय?
Protesters clash with police outside the US Embassy in Karachi over Khamenei’s assassination.
Protesters clash with police outside the US Embassy in Karachi over Khamenei’s assassination.Saam Tv
Published On

हा हिंसाचार आहे... पाकिस्तानच्या कराचीमधील.. इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे प्रमुख अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. आणि याच हत्येनंतर आता अमेरिकेविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं होतायत...खामेनीच्या हत्येविरोधात पाकिस्तानच्या कराचीमध्ये हिंसाचार उफाळलाय.. 'माय कोलाची रोड'वरील अमेरिकन वाणिज्य दूतावासावर आंदोलनकर्त्यांनी हल्ला करत दूतावास पेटवून दिलयं....इतकच काय तर अमेरिकन दूतावासात तोडफोड ही करण्यात आली... आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पाकिस्तानच्या पोलिस प्रशासनाला नाकीनऊ आलेलं असताना आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करत खामेनीच्या हत्येविरोधात रोष व्यक्त केलाय...

खामेनीची हत्या, पाकिस्तान पेटला

पाकिस्तानमधील आंदोलनात 9 जणांचा मृत्यू

30 आंदोलक जखमी

पोलिसांकडून अश्रुधुराचा आणि लाठीचार्च

लाहोर, पेशावर, रावळपिंडीमध्ये शिया समाजाचे लोक रस्त्यावर

पाकमधील इतर शहरांमध्ये हिंसा पेटण्याची शक्यता

पाक आणि इराणमधील संबंधांना अलीकडे एक 'सकारात्मक वळण' मिळालं होत... पाकिस्तानने अलीकडेच सौदी अरेबियाशी एक महत्त्वाचा संरक्षण करार केल्यानं इराणशी पाकची जवळीक वाढली होती... अशातच खामेनींच्या हत्यानंतर पाकमध्ये हिंसाचार उसळलाय...पाकिस्तानात शिया समुदायाची लोकसंख्या लक्षणीय आहे..त्यात खामेनी हे शिया समुदायाचे एक प्रमुख धार्मिक नेते मानले जातात.. त्यामुळेच खामेनींच्या हत्येनंतर पाक पेटलाय... आता खामेनींच्या हत्येमुळे मध्य-पूर्वत तणाव निर्माण झालेला असताना पाकिस्तान आंदोलकांना शांत करू शकणार की आंदोलन आणखी चिघळणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com