L&T chairman SN Subrahmanyan saam tv
देश विदेश

घरी पत्नीला किती वेळ बघत बसाल? त्यापेक्षा ९० तास काम करा, L&T चेअरमन सुब्रमण्यन यांचं मोठं विधान

L&T chairman SN Subrahmanyan: गेल्या वर्षी इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी तरूणांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता L&T चे चेअरमन यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना आठवड्यातून 90 तास काम करण्याची सूचना केलीये.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या वर्षी इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी तरूणांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. यांनी आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान त्यांच्या या सल्ल्यानंतर केवळ देशातच नाही तर परदेशातही चर्चा सुरू झाली. आता आणखी एका मोठ्या कंपनीच्या चेअरमनने याबाबत मोठं विधान केलं आहे.

L&T चे चेअरमन यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना आठवड्यातून 90 तास काम करण्याची सूचना केलीये. इतकंच नाही तर L&T चे चेअरमन एसएन एसएन सुब्रमण्यन यांनी तर 'तुम्ही किती दिवस घरी बसून तुमच्या पत्नीकडे बघणार?' असंही म्हटलंय.

रविवारी देखील काम करवून घेईन

लार्सन अँड टुब्रो'चे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना ही सूचना केली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ९० तास काम करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मी स्वतः रविवारी कार्यालयात येतो आणि शक्य झाल्यास रविवारीही कर्मचाऱ्यांना काम करायला लावतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं सुब्रमण्यम यांचं हे विधान अशा वेळी केलं आहे ज्यामध्ये त्यांच्या कंपनीत सहा दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या धोरणाची चर्चा सुरू होती.

Reddit वर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये, L&T चेअरमनने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला दिला नाही, तर 'तुम्ही किती वेळ घरी राहून तुमच्या पत्नीकडे पाहाल. घरी कमी आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवा.'

कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सुब्रमण्यम पुढे म्हणाले की, मी तुम्हाला रविवारी काम करायला लावू शकत नाही याची मला खंत आहे. जर मी तुम्हाला असं करायला लावू शकलो तर मला अधिक आनंद होईल, कारण मी स्वतः रविवारी काम करतो.

चीनी वर्क कल्चरचं दिलं उदाहरण

आठवड्यातील ९० तासांच्या कामाच्या आठवड्याबद्दल सुचवताना एल अँड टी चेअरमनने एका चिनी व्यक्तीशी केलेल्या संभाषणाचं उदाहरणही दिलं. ते म्हणाले की, त्या व्यक्तीने असा दावा केला होता की, चीन अमेरिकेला मागे टाकू शकतो कारण चिनी कामगार आठवड्यातून 90 तास काम करतात. तर अमेरिकेत 50 तास काम आहे. यावेळी त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला की, जर तुम्हाला जगाच्या शिखरावर राहायचं असेल तर तुम्हाला आठवड्याला 90 तास काम करावे लागेल, मित्रांनो पुढे जा.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवरही टीका होतेय. सुब्रमण्यन यांच्या या विधानाची तुलना इन्फोसिसचे अध्यक्ष एनआर नारायण मूर्ती यांच्या ७० तासांच्या कामाच्या विधानाशी केली जातेय. जो गेल्या वर्षी चर्चेचा विषय ठरला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT