Child cardiac Arrest: लहान मुलांना हार्ट अटॅक येण्याची कारणं वेगळी, पालकांनी काय केलं पाहिजे, तज्ज्ञांनी दिला सल्ला

Child cardiac Arrest: कर्नाटकात 8 वर्षीय चिमुकलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या ८ वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
Child cardiac Arrest
Child cardiac Arrestsaam tv
Published On

नुकतंच कर्नाटकात एक दुखःद घटना घडली. कर्नाटकात 8 वर्षीय चिमुकलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या ८ वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. शाळेत जमिनीवर कोसळल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू कमी रक्तदाब किंवा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा शंका व्यक्त केलीये.

Child cardiac Arrest
Metastatic breast cancer: तिसऱ्या-चौथ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सर पेशंटसाठी आशेचा किरण; ट्रीटमेंट होणार स्पेशल

आता ही बातमी वाचून तुमच्याही मनात असा प्रश्न येईल की, लहान मुलांनाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? तर याचं उत्तर आपल्याला तज्ज्ञांनी दिलं आहे. लहान मुलांना येणाऱ्या हार्ट अटॅकमागे काय कारणं असू शकतात, याची माहिती आपल्याया तज्ज्ञांनी दिली आहे.

नेमकी घटना काय?

तेजस्विनी असं या शाळकरी मुलीचं होतं. तेजस्विनी इयत्ता तिसरीत शिकत असून सोमवारी सकाळी इतर विद्यार्थ्यांसोबत शाळेत गेली होती. शाळेत तिची अचानक तब्येत बिघडली आणि तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आलं.

Child cardiac Arrest
भात की चपाती? तुमच्या आरोग्यासाठी पाहा काय योग्य आहे

तज्ज्ञांचं म्हणणं काय?

बॉम्बे रूग्णालयातील कंसल्टंट कार्डियोलॉजीस्ट डॉ. नागेश वाघमारे सामशी बोलताना म्हणाले की, हार्ट अटॅकची लहान मुलांमध्ये दिसून येणारी कारणं ही वेगळी असतात. यामध्ये दोन कारणं असू शकतात, त्यातील एक म्हणजे जेनेटीक आणि दुसरं म्हणजे स्ट्रक्चरल. मुळात लहान मुलांना हार्ट अटॅक येणं ही गोष्ट फार दुर्मिळ आहे.

Child cardiac Arrest
तुमच्या वयोमानानुसार, रक्तामध्ये चांगलं कोलेस्ट्रॉल किती प्रमाणात असलं पाहिजे?

डॉ. वाघमारे यांच्या सांगण्यानुसार, ज्या कुटुंबामध्ये अचानक हार्ट अटॅक येण्याचा इतिहास असेल त्या पालकांनी मुलांची जेनेरीक स्क्रिनिंग करून घ्यावी. जेणेकरून काही धोका असेल तर तो आधीच लक्षात येण्यास मदत होईल.

Child cardiac Arrest
HMPV Virus: बापरे! मुंबईमध्ये HMPV चा रूग्ण आढळला, ६ महिन्यांच्या बाळाला लागण

लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक येण्याची लक्षणं

  • लहान मुलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं लक्षण म्हणजे ओठांभोवती निळे डाग येणं.

  • मुलाला श्वास घेण्यास त्रास होत आहे

  • काही वेळ चालल्यानंतर मुलामध्ये दम लागणं

  • मुलाचा खराब शारीरिक विकास

  • छातीत दुखणं

  • चक्कर येण्याची तक्रार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com