भात की चपाती? तुमच्या आरोग्यासाठी पाहा काय योग्य आहे

Surabhi Jayashree Jagdish

चपाती की भात?

भात आणि चपाती यापैकी काय खाणे जास्त फायदेशीर आहे याबद्दल अनेकांचा गोंधळ होतो. आज आम्ही तुमचा हा गोंधळ दूर करणार आहोत.

भातासोबत एनर्जी वाढवा

तांदळात कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात असतात. हे खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि ते सहज पचवता येते.

चपातीमध्ये भरपूर फायबर

गव्हाचे पीठ हे सर्वात फायबर युक्त पीठ मानलं जातं. हे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

कॅलरी फरक

चपाती आणि तांदळाच्या कॅलरी सामग्रीमध्ये खूप फरक आहे. एका वाटीत तांदळात सुमारे 200 कॅलरीज असतात आणि रोटीमध्ये 70 ते 80 कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर चपाती खावी.

साखरेची पातळी

पांढरा भात खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. चपाती हळूहळू साखर वाढवते जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

भूकेवर नियंत्रण

जर तुम्हाला जास्त वेळ पोट भरलेलं हवं असेल तर चपाती खा. भात फार कमी वेळात पचतो त्यामुळे भूक लवकर लागते.

अधिक पौष्टिक काय?

चपातीमध्ये प्रोटीम, फायबर आणि सूक्ष्म पोषक घटक असतात. तर तांदळात कार्बोहायड्रेट असतात जे शरीराला ऊर्जा देण्यासाठी फायदेशीर असतात.

जीवनशैली

तुम्हाला हलके आणि सहज पचणारे अन्न हवे असेल तर भात खाणं योग्य आहे. परंतु जर तुम्हाला दीर्घकाळ उर्जेची गरज असेल तर चपाची अधिक योग्य आहे.

ताजमहालच्या तळाशी का आहे ५० विहिरी? रहस्य जाणून व्हाल हैराण

taj mahal | saam tv
येथे क्लिक करा