HMPV Virus: बापरे! मुंबईमध्ये HMPV चा रूग्ण आढळला, ६ महिन्यांच्या बाळाला लागण

HMPV Virus in Mumbai: HMPV व्हायरसने मुंबईत एन्ट्री केली आहे. एका ६ महिन्यांच्या बाळाला याची लागण झाल्याची माहिती आहे.
HMPV Virus
HMPV Virussaam tv
Published On

HMPV व्हायरसने देशात एन्ट्री केलीच होती. मात्र आता त्याने मुंबईत देखील एन्ट्री केल्याची माहिती आहे. HMPV चा एक रूग्ण मुंबईत सापडला आहे. एका ६ महिन्यांच्या बाळाला या व्हायरसची लागण झाल्याची माहिती आहे. दरम्यान या बाळावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे.

HMPV Virus
HMPV Virus: भारताचं टेन्शन वाढलं; HMPV पहिल्यांदा कुठून आला, खबरदारीसाठी काय करावं, काय करू नये?

चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या HMPV ने भारताच्या चिंता वाढवल्या आहेत. आतापर्यंत देशभरात 8 पेक्षा जास्त रुग्ण आढळले असून या विषाणूचा मुंबईतही शिरकाव झालाय. मंगळवारी नागपूरमध्ये 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला HMPV ची लागण झाल्याची माहिती होती. दरम्यान आता या पार्श्वभुमीवर सरकार अलर्ट मोडवर आलं असून जे. जे हॉस्पिटल्सच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळेंच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलीये.

HMPV Virus
Kidney Cancer: किडनी कॅन्सरवेळी सुरुवातीला शरीर देतं 'हे' संकेत; रात्रीच्या वेळेस जाणवतील अचानक बदल

HMPV ची लक्षणं

  • सर्दी

  • खोकला

  • ताप

  • घसा खवखवणे

  • धाप लागणे

  • जुलाब

  • अंगावर पुरळ

HMPV Virus
Kidney Cancer: किडनी कॅन्सरवेळी सुरुवातीला शरीर देतं 'हे' संकेत; रात्रीच्या वेळेस जाणवतील अचानक बदल

काय करू नये?

  • डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळलं पाहिजे

  • हस्तांदोलन करू नये

  • सार्वजनिक ठिकाणी अजिबात थुंकू नका

  • ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये

  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नये

HMPV Virus
HMPV Virus: भारताचं टेन्शन वाढलं; HMPV पहिल्यांदा कुठून आला, खबरदारीसाठी काय करावं, काय करू नये?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com