Surabhi Jayashree Jagdish
फेब्रुवारीला लव्हर्स मंथ म्हणजेच प्रेमाचा महिना म्हटलं जातं तर त्याआधीच्या जानेवारीला 'घटस्फोट महिना' म्हणजेच 'डिवोर्स मंथ' म्हणतात.
जगभरात सर्वाधिक घटस्फोट वर्षाच्या पहिल्या महिन्यात होतात. यासाठी अनेक कारणे दिली जातात.
यामध्ये नवीन वर्षाच्या आधी लांब सुट्ट्या, कौटुंबिक दबाव आणि नवीन वर्षाचे संकल्प या सर्वांमुळे घटस्फोट होतो, असं मानलं जातं
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीनंतर लोक तणावग्रस्त होतात आणि नात्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वाढते.
एका अभ्यासानुसार, 2001 ते 2015 दरम्यान, डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीमध्ये वॉशिंग्टनमध्ये घटस्फोटाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
लोक Google वर घटस्फोटाबद्दल 100% अधिक शोधतात.
रिचर्ड नेल्सन एलएलपीच्या अहवालानुसार, या कालावधीत घटस्फोटासाठी वकिलांशी संपर्क साधणाऱ्यांची संख्या 30% वाढते.