Goa BJP Leader Son Soham Naik News  Saam Tv
देश विदेश

Shocking : भाजप नेत्याच्या मुलाचे सेक्स स्कँडल उघड; २५ हून अधिक मुलींचे शोषण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

BJP Leader Son Soham Naik News : दक्षिण गोव्यात अल्पवयीन मुलींच्या शोषण आणि ब्लॅकमेल प्रकरणात नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Alisha Khedekar

  • दक्षिण गोव्यात खळबळ

  • नगरसेवकाच्या मुलाला पोलिसांनी केली अटक

  • अल्पवयीन मुलींच्या शोषण आणि ब्लॅकमेलचे आरोप

  • कठोर कारवाईची मागणी

दक्षिण गोव्यातून एक अत्यंत गंभीर आणि खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. एका भाजप नगरसेवकाच्या मुलाने २५ ते ३० अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून, त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजप नगरसेवकांचे पुत्र सोहम नाईक याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून सोहम अल्पवयीन मुलींशी शारीरिक संबंध ठेवत होता. त्यांचे गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड करून पीडित मुलींना धमकावण्यासाठी आणि गप्प राहण्यास भाग पाडण्यासाठी या व्हिडिओंचा तो वापर करत होता. गेल्या आठवड्यात एका पार्टीदरम्यान, आरोपीने कथितरित्या हे व्हिडिओ त्याच्या मित्रांना दाखवून आपल्या कृत्यांबद्दल सांगितले, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.

ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, काहींनी या प्रकरणाचे राजकारण केले जात असल्याचा आणि त्याचा संबंध भाजपशी असल्याचा आरोप केला. स्थानिक रहिवाशांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून आरोपीच्या अटकेची मागणी केल्याने परिस्थिती चिघळली. स्थानिक नागरिकांच्या वाढत्या दबावाखाली पोलिसांनी कारवाई करत रविवारी रात्री सोहम नाईकला अटक केली.

पोलिसांचे म्हणणे आहे की, तपास सुरू असून प्रकरणाच्या सर्व बाजूंनी कसून तपासणी केली जात आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? हे शोधण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. या घटनेनंतर संपूर्ण दक्षिण गोव्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. पीडितांना न्याय मिळावा आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी लोक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विधानभवनाबाहेर एका व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न

Evil Eye Anklets Design: नजर लागू नये म्हणून पायात घाला 'इव्हिल आय एंकलेट', लेटेस्ट ट्रेडिंग 5 पॅटर्न

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे प्रवास सुपरफास्ट होणार; गेम चेंजर 'मिसिंग-लिंक' कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today : सोन्याच्या दरात वाढ; 1 तोळ्यामागे 2000 रुपयांची वाढ, काय आहे आजचा ताजा भाव ?

EPFOचा मोठा निर्णय! कोणत्याही क्लेमशिवाय खात्यात जमा होणार पीएफचे पैसे; कोणाला होणार फायदा?

SCROLL FOR NEXT