Plane Crash : १२५ सैनिकांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात; ६६ जणांचा मृत्यू
कोलंबियात C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात
१२५ सैनिकांपैकी ६६ जणांचा मृत्यू
पेरू सीमेजवळ दुर्घटना
अनेक जखमी
मानवी वस्तीपासून दूर असल्याने मोठा अनर्थ टळला
Colombia Military Aircraft Crash Near Peru Border 66 Soldiers Death कोलंबियामधून मोठी बातमी समोर आली आहे. सोमवारी १२५ सैनिकांना घेऊन जाणाऱ्या हवाई दलाचे 'सी-130 हरक्यूलिस' या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आतपर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अनेक जण जखमी असल्याचं हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्ताने म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलंबिया हवाई दलाचे 'सी-130 हरक्यूलिस' हे विमान उड्डाण केल्यानंतर क्षणात कोसळून त्याला भीषण आग लागली. या विमानातून एकूण १२५ जवान प्रवास करत होते. हे विमान पेरूच्या सीमेजवळ असलेल्या प्यूर्टो लेगुइजामो येथून सैनिकांना घेऊन जात असताना दुर्दैवी अपघात झाला. त्यानंतर कोलंबियाच्या सैन्यदलात एकच खळबळ उडाली आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. हे विमान मानवी वस्तीपासून साधारण ३ किलोमीटर दूर अंतरावर कोसळले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अजूनही घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. या घटनेमुळे कोलंबियात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
