Sojan joseph Social Media
देश विदेश

Success Story : २० वर्षांपूर्वी निर्णय घेतला अन् आता आयुष्याचं सोनं झालं; मूळचे केरळचे सोजन आता यूकेमध्ये संसद गाजवणार

Vishal Gangurde

नवी दिल्ली : यूकेमधील सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाने ४०० पार जागा जिंकत ऋषि सुनक सरकारला सुरुंग लावला. मजूर पक्षाने तब्बल १४ वर्षांनी सत्तास्थानावर पुनरागमन केलं आहे. मजूर पक्षाने एकूण ४१२ जागा जिंकल्या. त्यामुळे मजूर पक्षाचे ४१२ खासदार यूकेमधील लोकांचं प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यात केरळातून २० वर्षांपूर्वी यूकेमध्ये स्थलांतरित झालेल्या सोजन जोसेफ यांचाही समावेश असणार आहे. केरळमधून स्थलांतरित होऊन यूकेमध्ये खासदार झालेले पहिले खासदार ठरले आहेत.

भारतीय वंशाचे ४९ वर्षीय सोजन जोसेफ यांनी मजूर पक्षातर्फे अॅशफोर्ड मतदारसंघातून निवडणूक लढली. या मतदारसंघात सोजन जोसेफ यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला. जोसेफ यांनी या मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

आता सोजन जोसेफ हे ब्रिटिश संसदेत खासदार म्हणून लोकांचं प्रतिनिधित्व करणार आहेत. सोजन जोसेफ यांचा केरळमध्ये शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांनी बेंगळुरुमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेजमध्ये नर्सिंगचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी देहरादूनमधील रुग्णालयात कामही केलं.

'सोजेन हे २००१ साली यूकेमध्ये गेले. ते यूकेमधील सरकारी आरोग्य सेवेत नर्स म्हणून रुजू झाले. केरळामध्ये शिक्षण घेताना राजकीय क्षेत्रात करिअर करण्याची त्यांची इच्छा नव्हती. पण ते चांगले संघटक आहेत. अॅशफोर्डमधील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी त्यांनी मागील दोन वर्षांपूर्वी सल्लागार म्हणूनही काम केलं आहे, असे त्यांच्या बहिणीने सांगितलं.

सोजन यांच्या पत्नीही नर्स आहेत. सोजन यांच्या पत्नीचं नाव ब्रिटा असून त्यांना तीन मुले आहेत. सोजन यांची मोठी बहीणही यूकेमध्ये नर्स आहेत. 'सोजन यांनी मार्च महिन्यात केरळला भेट दिली. यूकेमधील निवडणूक आव्हानात्मक होती. मात्र, सोजन यांना जिंकून येईल, असा आत्मविश्वास होता, असेही त्यांच्या बहीणीने सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale: चुकिला माफी नाही! ग्रँड फिनालेमध्ये आर्या जाधवला नो एन्ट्री? चर्चांना उधाण

Parbhani News: 'सबका बदला लुंगा फिर लौटुंगा', चिठ्ठी लिहली अन् १२ वीतील मुलाने मृत्यूला कवटाळलं; परभणीत खळबळ

VIDEO: राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

Marathi News Live Updates : मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

साउथ अभिनेत्याची मेहुणी गाजवणार Bigg Boss 18चं पर्व; केली धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT