UK Election 2024 : 14 वर्षांनंतर ब्रिटनमध्ये सत्तांतर; मजूर पक्षाची 400 पार मुसंडी, ऋषी सुनक यांच्या सत्तेला सुरूंग

UK Election : जगाचं लक्ष लागलेल्या ब्रिटनच्या निवडणूकीत सत्ताधारी हुजूर पक्षाचा मोठा पराभव झालाय. ब्रिटनच्या संसदेत भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाला अवघ्या 121 जागांवर समाधान मानावं लागलंय. तर मजूर पक्षाने 412 जागांवर मुसंडी मारलीय
UK Election 2024
UK Election 2024Saam Digital
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

जगाचं लक्ष लागलेल्या युकेच्या निवडणूकीत सत्ताधारी हुजूर पक्षाचा दारुण पराभव झालाय. तर मजूर पक्षाने 400 पार मुसंडी मारलीय. मात्र यात भारतीय वंशाचे ऋषी सुनकांना मोठा धक्का बसलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

UK Election 2024
Who Is Keir Starmer: ब्रिटनमध्ये ४०० पार! ऋषी सुनक यांना धोबीपछाड; कोण आहेत नवे पंतप्रधान कीर स्टार्मर?

जगाचं लक्ष लागलेल्या ब्रिटनच्या निवडणूकीत सत्ताधारी हुजूर पक्षाचा मोठा पराभव झालाय. मजूर पक्षाचे किर स्टार्मर विरुद्ध हुजूर पक्षाचे ऋषी सुनक यांच्यात जोरदार लढत झाली. 650 जागा असलेल्या ब्रिटनच्या संसदेत भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाला अवघ्या 121 जागांवर समाधान मानावं लागलंय. तर मजूर पक्षाने 412 जागांवर मुसंडी मारलीय...त्यामुळे ऋषी सुनक यांना हा मोठा धक्का मानला जातोय.

ब्रिटनमध्ये सत्तांतर

किर स्टार्मरचा मजूर पक्ष- 412 जागांवर विजयी

ऋषी सुनक यांचा हुजूर पक्ष- 121 जागा

लिबरल डेमॉक्रेटिक पक्ष- 71

स्कॉटिश नॅशनल पक्ष- 9

इतर- 35 जागांवर विजय

UK Election 2024
Earth News Today : पृथ्वीवर आदळणार लघुग्रह, मानवाचं अस्तित्व येणार धोक्यात? 'एपोफिस'वर 'नासा', 'इस्रो'ची नजर

14 वर्षापासून सत्तेत असलेल्या हुजूर आणि मजूर पक्षात जोरदार लढत झाली. ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाला सर्वाधिक सत्तेत राहण्याची संधी मिळालीय. मात्र 14 वर्षानंतर किर स्टार्मर यांच्या नेतृत्वात मजूर पक्षाने 400 पार मुसंडी मारलीय. यामध्ये सुनक सरकारला महागाई हाताळण्यात आलेलं अपयश हा त्यांच्या पराभवातील महत्वाचं कारण मानलं जातं. आता ब्रिटनचे नवे पंतप्रधान मानवी हक्कांवर जोर देणारे असल्याने भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध कसे राखले जातील? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com