या निवडणुकीत ऋषी सुनक यांच्या पक्षाला ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीयांचाही पाठिंबा मिळालेला नाही. ऋषी सुनक यांचे ११ मंत्री पराभूत झालेत.
सुनक यांच्या पराभवामागे भारतीय वंशाच्या लोकांचा राग हे कारण असल्याचं बोललं जात आहे. ब्रिटनमध्ये सध्या १८ लाख भारतीय वंशाचे मतदार आहेत. यातील ६५ टक्के सुनक सरकारवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
सुनक यांना ब्रिटनची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली करता आली नाही. तसेच ब्रिटनमधील महागाई कमी करण्यात ऋषी सुनक पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. कर सातत्याने वाढत राहीले. राहणीमानाचा खर्च वाढतच गेला.
जेव्हा ऋषी सुनक पंतप्रधान झाले होते, तेव्हा सर्वांना सुनक महागाई नियंत्रणात आणतील, असं वाटत होतं. परंतु त्यानंतर वस्तू महाग झाल्या आणि लोकांचा खर्च झपाट्याने वाढला. त्यामुळे लोकांमध्ये सुनक सरकारबद्दल चीड निर्माण झाल्याचं बोललं जातंय.
कंझर्व्हेटिव्ह पक्ष सत्तेवर आल्यानंतर करांमध्येही वाढ झाल्याचे दिसून आले. सुनक सरकारने अनेक प्रकारचे कर वाढवले होते. त्यापैकी एक एनआरआय कर होता. यामुळे देखील सुनक सरकारविरोधात विरोध वाढला होता.
ब्रिटनमध्ये गृहनिर्माण ही मोठी समस्या आहे. या निवडणुकीतही तो मोठा मुद्दा ठरला. मजूर पक्षाने आपल्या गृहनिर्माण योजनेंतर्गत लाखो नवीन घरे बांधण्याचा रोड मॅप तयार केलाय.
ब्रिटनच्या ऋषी सुनक सरकारला गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी घटना रोखण्यात अपेक्षित यश मिळालेलं नाही. त्यामुळे देखील ऋषी सुनक यांचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.