S N Subrahmanyan Salary  Saam tv
देश विदेश

S N Subrahmanyan Salary : संडेला बायकोला किती वेळ बघत बसाल म्हणणाऱ्या L&T अध्यक्षांना किती पगार मिळतो? आकडा वाचून बसेल धक्का

S N Subrahmanyan Salary in marathi : L&T अध्यक्ष एस एन सुब्रमण्यन हे सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांना किती पगार मिळतो, याविषयी माहिती हाती आली आहे. त्यांच्या पगाराचा आकडा वाचून धक्का बसेल.

Vishal Gangurde

मुंबई : L&Tचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी आठवड्याला ९० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु झाली. यानंतर वर्क लाइफ बॅलेन्स आणि एसएन सुब्रमण्यन यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तसेच रविवारी बायकोला किती वेळ बघत राहाल, असे म्हणणारे एल अँड टी कंपनीचे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यन यांना वर्षाला ५१ कोटी रुपये पगार मिळतो.

एल अँड टी कंपनीचे अध्यक्ष सुब्रमण्यन यांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्या वक्तव्यारून त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. तसेच त्यांच्या पगाराचीही जोरदार चर्चा होऊ लागली आहे. न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, सुब्रमण्यन यांचा वार्षिक २०२३-२४ या वर्षातील पगार ५१ कोटी रुपये होता. त्यात ३.६ कोटी रुपये बेस सॅलरी आहे.

१.६७ कोटी प्रीरिक्वेस्टिव वर्थ, ३५.२८ कोटी रुपयांचं कमिशन आणि १०.५ कोटी रुपयांच्या निवृत्तीच्या नफ्याचा समावेश आहे. त्यांचा पगार हा एल अँड टी कंपनीच्या साधारण कर्मचाऱ्यांच्या पगाराहून ५३४.५७ टक्क्यांनी अधिक आहे. तेथे साधारण कर्मचाऱ्यांचा वार्षिक पगार हा ९.५५ लाख रुपये आहे.

कंपनीने दिलं स्पष्टीकरण

एल अँड टी कंपनीचे अध्यक्ष सुब्रमण्यन यांच्या वक्तव्यानंतर कंपनीच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ९ जानेवारी रोजी कंपनी प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'एल अँड टी कंपनीचे अध्यक्ष सुब्रमण्यन यांच्या वक्तव्याचा अर्थ वेगळा होता. खूप चांगलं आणि स्मार्ट काम करा, अशा त्यांच्या वक्तव्याचा उद्देश होता. चांगलं काम केल्यावर रिझल्ट चांगला येतो'.

दीपिका पदुकोण भडकली

सुब्रमण्यन यांचं वक्तव्य अनेकांना रुचलं नाही. अनेकांनी त्यांच्या वक्तव्यावर टीका केली. यावर अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनेही प्रतिक्रिया दिली. तिने पत्रकार फैज डिसूजा यांची पोस्ट इन्स्टा स्टोरीवर शेअर करत वरिष्ठ व्यक्तींकडून अशा प्रकारचं वक्तव्य चक्रावणारं असून त्यांनी मानसिक आरोग्याचा विचार केला पाहिजे, असे तिने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT