ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुमच्या नखांचा रंग पिवळा झाला असेल किंवा नखे कमकुवत झाली असेल तर शरीरात काही पोषक तत्वांची कमतरता असू शकते.
शरीरात पोषक तत्वांची कमतरता असल्यास अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्यास नखांचा रंग पिवळा होतो आणि नखे कमकुवत होतात.
नखांचे पिवळे होणे आणि कमजोर होण्यामागचं कारण म्हणजे शरीरात बायोटिनची कमतरता देखील असू शकते.
व्हिटॅमिन ई मध्ये अँटीऑक्सिटडंटस भरपूर प्रमाणात असतात जे नखांना हेल्दी ठेवण्यास मदत करतात. याच्या कमतरतेमुळे नखे पिवळे होऊ शकतात.
शरीरात आयरनची कमतरता असल्यास नखे कमजोर होऊन तुटतात आणि पिवळे पडतात.
झिंकची कमतरता असल्यास नखांवर सफेद दाग होतात. आणि नखे कमजोर होतात.
हाडांना मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. याच्या कमतरेमुळे हाडं आणि नखे दोन्ही कमकुवत होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: मकर संक्रातीला करा खास श्रीखंड- पुरीचा बेत, सोप्या पद्धतीने घरीच बनवा स्वादिष्ट आणि ताजे श्रीखंड