ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
१लीटर दूध, पिठीसाखर, केसर, काजू, बादाम, पिस्ता, जायफळ पावडर, वेलची पावडर, २ चमचे कोमट दूध
सर्वप्रथम १ लीटर दूध गरम करुन घ्या. आणि यात १ चमचा दही मिक्स करुन दही तयार करुन घ्या.
एका भांड्यावर चाळणी ठेवा आणि त्यावर मुसलिन किंवा पातळ कापड ठेवा आणि तयार झालेले दही यामध्ये ओता.
चाळणीमध्ये ओतलेले दहीचे कापड घट्ट बांधून घ्या. आणि दही काही वेळेसाठी खुंटीला लटकवून ठेवा. सर्व पाणी काढून घ्या.
चक्क्यामध्ये पिठीसाखर ॲड करुन चांगले फेटून घ्या. आणि एका वाटीमध्ये दोन चमचे कोमट दूध घ्या यात १० ते १२ केसरच्या काड्या ॲड करा.
पिठीसाखर ॲड केलेल्या मिश्रणात हे केसरयुक्त दूध ॲड करुन चांगले मिक्स होईपर्यंत फेटून घ्या.
तयार झालेल्या मिश्रणात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि ड्रायफ्रुट्सचे काप ॲड करुन मिश्रण चांगले मिक्स करुन घ्या.
हे मिश्रण फ्रिजरमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. अशाप्रकारे ताजे आणि स्वादिष्ट श्रीखंड तयार झाले.
NEXT: राजकीय नेत्यांचे बॅाडीगार्ड नेहमी काळ्या रंगाचा गॉगल का घालतात?