Satya Nadella Salary: मायक्रोसॉफ्टच्या सीईओच्या कमाईत थेट 5.5 मिलियनने घटली? काय आहे कारण ?

Satya Nadella Salary: स्टॉक अवॉर्ड्समुळे सत्या नडेला यांच्या उत्पन्नात वाढ झालीय. नडेला यांचा स्टॉक अवॉर्ड्स मागील वर्षी ३९ मिलियन डॉलरने वाढून ७१ मिलियन डॉलर झाला होता.
Satya Nadella Salary: मायक्रोसॉफ्टच्या सीईओच्या कमाईत थेट 5.5 मिलियनने घटली? काय आहे कारण ?
Published On

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या पगारात कपात करण्यात आलीय. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ६३ टक्केची वृद्धी झालीय. कंपनीने यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन (एसईसी) कडे दाखल केलेल्या निवेदनात हे म्हटलंय. जून ३० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी नडेला यांची एकूण भरपाई अंदाजे $७९.१ दशलक्ष (अंदाजे 665 कोटी रुपये) होती.

TOI अहवालानुसार, ही वाढ प्रामुख्याने स्टॉक अवॉर्ड्समुळे झालीय. नडेला यांचा स्टॉक अवॉर्ड्स मागील वर्षी ३९ मिलियन डॉलरने वाढून ७१ मिलियन डॉलर झाला होता. दरम्यान नडेला यांनी आपल्या स्वेच्छेने रोख भरपाई कमी करण्याची विनंती केली होती. एसईसी फायलिंगमधून हा खुलासा झालाय. त्यांना $ १०.७ दशलक्ष मिळणार होते, परंतु त्याचे रोख प्रोत्साहन $ ५.२ दशलक्षाने कमी करण्यात आले. त्यांच्या २०२४ च्या भरपाईमध्ये $२.५ दशलक्ष मूळ पगार आणि $ १७०,००० इतर लाभांचा समावेश आहे.

सत्या नडेला यांनी कपात करण्याची विनंती का केली?

अनेक सायबर सुरक्षा उल्लंघनानंतर रोख कपातीची विनंती करण्यात आली होती. यात जुलै २०२३ मधील मायक्रोसॉफ्ट आउटेजचाहही समावेश आहे. यात जागतिक पातळीवरील युझर्स प्रभावित झाले होते.यासह यूएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने एप्रिल २०२४ मध्ये एक रिपोर्ट जाहीर केला होता. यात चिनी कलाकारांद्वारे यूएस अधिकाऱ्यांच्या ईमेल खात्यांच्या सायबर उल्लंघनाच्या स्वतंत्र तपासाची माहिती देणारा अहवाल होता.

जुलैमध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये उल्लंघन झाल्याचं मान्य करण्यात आलं होतं. वर्षाच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टने पृष्टी केली होती की, रशियाच्या इंटेलिजेन्सने मायक्रोसॉफ्टच्या शीर्ष अधिकाऱ्यांच्या संबंधित ईमेल खात्यांपर्यंत पोहोचली. "नडेला यांनी मान्य केले की, कंपनीची कामगिरी अत्यंत मजबूत आहे, परंतु सुरक्षेसाठी त्यांची वैयक्तिक वचनबद्धता आणि सीईओ म्हणून बोर्डाला प्रस्थापित कार्यप्रदर्शन मेट्रिक्सपासून हटण्यास सांगितले आणि त्यांचे रोख प्रोहत्सान वापरण्यास सांगितले," असे फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

सत्या नडेला यांची कमाई

स्टॉक अवॉर्ड : ७१,२३६,३९२ डॉलर साधारण ६०० कोटी रुपये

नॉन-इक्विटी प्रोत्साहन योजना- ५.२ मिलियन डॉलर ४४ कोटी रुपये

बेस सॅलरी - २.५ मिलियन डॉलर ( २१ कोटी रुपये)

इतर भत्ता - १६९.७९१ डॉलर साधारण १५ लाख रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com