S Somnath Saam (संग्रहित छायाचित्र )
देश विदेश

ISRO Chief: सिवन यांना एस सोमनाथ नको होते इस्रोचे प्रमुख; आत्मकथेवरुन वाद होताच सोमनाथ यांनी दिलं स्पष्टीकरण

S Somnath : दक्षिण भारतीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एस सोमनाथ यांनी इस्रोचे आधीचे प्रमुख सिवन यांच्याविषयी मोठं विधान केलंय.

Bharat Jadhav

S Somnath His Autobiography Nilavu Kudicha Simhangal :

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी निलावू कुदिचा सिंहांगल या नावाची आत्मकथा लिहिलीय. मळल्याम भाषेत लिहिलेल्या या पुस्तकात इस्रो प्रमुखांनी आपल्या जीवनात आलेले अनुभव सांगितले आहेत. दरम्यान या पुस्तकात लिहिण्यात आलेल्या एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधलंय. दक्षिण भारतीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एस सोमनाथ यांनी इस्रोचे आधीचे प्रमुख सिवन यांच्याविषयी मोठं विधान केलंय. (Latest News)

एस. सोमनाथ हे इस्रोचे प्रमुख बनू नये, असं सिवन यांना वाटत असल्याचं या पुस्तका म्हटलंय. तसेच सोमनाथ यांनी आपल्या चंद्रयान-२ च्या अपयशाविषयीही भाष्य केलंय. दक्षिण भारतातील वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्रोचे आधीचे प्रमुख सिवन यांना सोमनाथ हे प्रमुख म्हणून नको होते. याविषयीचा खुलासा निलावू कुदिचा सिंहांगल या पुस्तकात करण्यात आलाय. जेव्हा माध्यम प्रतिनीधींनी त्यांना याविषयी विचारणा करण्यात आली त्यावेळी सोमनाथ यांनी नाव घेतलं नाही. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सोमनाथ म्हणाले की, मी कोणत्या व्यक्तीवर टिप्पणी केली नाही किंवा टीका केलीय नाही.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एस सोमनाथ यांनी सांगितली खरी गोष्ट

दक्षिण भारतीय माध्यमांकडून करण्यात येणाऱ्या दाव्यांवर स्वतः सोमनाथ यांनी सांगितलंय. आपल्या पुस्तकाचा उल्लेख करताना म्हणाले की, यात कोणतीही व्यक्ती वरील पदावर जाण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. माझ्या आयुष्यातही अनेक प्रकारचे आव्हान आली आहेत. मी माझ्या पुस्तकात अशी कोणत्या व्यक्तीचा उल्लेख केला नाहीये. तसेच कोणत्या व्यक्तीवर आरोप केले नाहीत. मी फक्त मुद्दा उपस्थित केलाय.

चांद्रयान-२ का झाले अयशस्वी

एस सोमनाथ यांनीही चांद्रयान-2 का अयशस्वी झाले याचेही कारण सांगितले चांद्रयान-२ मोहीम घाईमुळे अयशस्वी झाले होतं. या मोहिमेसाठी ज्या चाचण्या व्हायला हव्या होत्या, त्या झाल्या नाहीत. चांद्रयान-२ च्या अपयशात झालेल्या चुका लपवल्या गेल्याचे सोमनाथ यांनी या पुस्तकात म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

Maharashtra Live News Update: जांभोरा येथील पाझर तलाव फुटला, शेतीचे मोठं नुकसान

Janhvi Kapoor: चंद्रावाणी मुखडा तिचा...; जान्हवी कपूरचा दहीहंडी स्पेशल लूक पाहिलात का?

Shirdi : दहीहंडीच्या मिरवणुकीत हत्येचा थरार, जुन्या वादातून मित्रांकडून १८ वर्षीय तरुणाची हत्या

SCROLL FOR NEXT