Explainer: श्रीहरिकोटा येथून का लॉन्च होतात इस्रोचे मोठे मिशन?

Why ISRO's missions launched From Sriharikota: श्रीहरिकोटा येथून का लॉन्च होतात इस्रोचे मोठे मिशन?
Why are ISRO big missions launched from Sriharikota
Why are ISRO big missions launched from SriharikotaSaamtv
Published On

Why ISRO's missions launched From Sriharikota: चांद्रयान-३ च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर इस्रोने आदित्य एल-१ लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपित केले जाईल. ही भारताची पहिली सौर मोहीम आहे. ज्यासाठी इस्रोने प्रक्षेपणासाठी पुन्हा एकदा श्रीहरिकोटाची निवड केली आहे.

श्रीहरिकोटा हे भारताचे प्रक्षेपण केंद्र आहे. 1971 पासून इस्रोने केलेल्या सर्व प्रमुख मोहिमा येथूनच लॉन्च करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर वसलेले हे बेट भारताचे प्राथमिक अंतराळ बंदर म्हणूनही ओळखले जाते. श्रीहरिकोटा सुल्लुरपेटा मंडळात आहे, जे भारतीय अंतराळ विज्ञानासाठी खूप महत्वाचे आहे. सतीश धवन अंतराळ केंद्राची स्थापना 1971 मध्येच झाली होती.

Why are ISRO big missions launched from Sriharikota
Shirdi Lok Sabha Constituency News: शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून मातोश्रीवर खडाजंगी, बबनराव घोलप की भाऊसाहेब वाकचौरे? उद्धव ठाकरेंसमोर पेच

श्रीहरिकोटा विशेष का आहे?

सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथे आहे, जिथून इस्रो सर्व मोहिमा प्रक्षेपित करते. हे ठिकाण विषुववृत्ताजवळ आहे. पृथ्वीच्या कक्षेत फिरणारे सर्व अवकाशयान किंवा उपग्रह विषुववृत्ताजवळून इंजेक्ट केले जातात. म्हणूनच श्रीहरिकोटा येथून रॉकेट प्रक्षेपित केल्याने मिशन यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. (Latest Marathi News)

अंतराळ मोहीम प्रक्षेपित करण्यासाठी, गर्दी आणि लोकांच्या हालचालीपासून दूर असलेल्या ठिकाणी एक स्पेस पोर्ट तयार केले जाते. श्रीहरिकोटा यासाठी अगदी योग्य ठिकाण आहे. हे आंध्र प्रदेशला जोडलेले एक बेट आहे, ज्याच्या दोन्ही बाजूला समुद्र आहे. अशा परिस्थितीत येथून प्रक्षेपण केल्यानंतर रॉकेटचे अवशेष थेट समुद्रात पडतात, मोहिमेला काही धोका असल्यास ते समुद्राच्या दिशेने वळवून जीवितहानी टाळता येते.

Why are ISRO big missions launched from Sriharikota
Beed News: नेत्यांची भाषणं, लोकांना पटेनात! ठोस घोषणा जाहीर न केल्यानं लोकांमध्ये निराशा

हवामान हे देखील आहे एक महत्वाचे कारण

अंतराळ मोहिमेसाठी श्रीहरिकोटाची निवड करण्यामागे हवामान हे देखील कारण आहे. खरे तर ते एक बेट आहे, त्यामुळे येथील हवामान साधारणपणे तसेच राहते. पावसाळा सोडला तर जवळपास दहा महिने इथले हवामान कोरडेच असते. त्यामुळे इस्रो श्रीहरिकोटाला अधिक प्राधान्य देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com