Shraddha Walker- Aftab Case Update
Shraddha Walker- Aftab Case Update SAAM TV
देश विदेश

Shraddha Walker Case Update : श्रद्धा वालकरनं २ वर्षांपूर्वीच व्यक्त केली होती भीती; लेटर आलं समोर

साम ब्युरो

Shraddha Walker Case Update : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आफताबचं काळं कृत्य समोर आलं आहे. ब्लेकमेलिंग आणि प्राणघातक हल्ला करण्याची भीती तिनं आफताबविरुद्ध पत्राद्वारे पोलिसांत केली होती, अशी माहिती उघड झाली आहे, सूत्रांनी ही माहिती दिली.

श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे. जे घडलं ते रागाच्या भरात...अशी कबुली काल आफताबनं कोर्टात दिल्याची माहिती होती. मात्र, श्रद्धाची हत्या केल्याचे आफताबनं कबूल केले नसल्याचे त्याच्या वकिलांनी नंतर स्पष्ट केले. दुसरीकडे, आफताबला आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तर, आफताब वेगवेगळी माहिती देऊन दिशाभूल करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (Latest Marathi News)

आता याच प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रद्धानं महाराष्ट्र पोलिसांना २३ नोव्हेंबर २०२० रोजी पत्र लिहिलं होतं. त्यात तिनं आफताबविरुद्ध तक्रार दाखल केली होती. ब्लॅकमेलिंग आणि प्राणघातक हल्ला होण्याची भीती तिनं या पत्रात व्यक्त केली होती.

काही आठवत नसल्याचं आफताबनं सांगितलं...

दिल्लीच्या साकेत कोर्टात आफताबला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायाधीशांसमोर हजर केले होते. त्यावेळी मी जे काही केलं ते रागाच्या भरात, असं त्यानं सांगितलं होतं. मात्र, आफताबनं दिलेला जबाब कोर्टानं रेकॉर्डवर घेतलं नसल्याचं त्याच्या वकिलांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे, आफताबची पॉलिग्राफ चाचणी झाली. त्यानंतर त्याची नार्को चाचणी होणार आहे. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weightloss Tips: झटपट वजन होईल कमी; आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Live Breaking News : पालघरचे खासदार राजेंद्र गावित घरवापसी करणार

Hardik Pandya Statement: 'मी स्वत:ला भाग्यवान समजतो..' मुंबईच्या विजयानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

Utkarasha Rupvate Car Attack | वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवतेंच्या गाडीवर दगडफेक

Beed Constituency: पंकजा मुंडे, बजरंग सोनवणेंना नोटीस, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 48 तासांमध्ये मागवला खुलासा; जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT