Shraddha Walker case : श्रद्धा वालकर प्रकरणात नवा ट्विस्ट; आफताबने बदलले स्टेटमेंट; ३५ नाही तर...

श्रद्धाची हत्या करून तिच्या शरिराचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आता या घटनेत अफताब सातत्याने त्याचे वक्तव्य बदलत आहे.
Shraddha Walker case
Shraddha Walker caseSaam tv
Published On

Shraddha Walker case Update : वसई (Vasai)येथील श्रद्धा वालकरची दिल्लीत हत्या करण्यात आली. तिच्या प्रियकराने तिची निघृण हत्या केल्याचे समोर आले आहे. अशात पोलिसांनी अफताबचा शोध घेतल्यावर चौकशी दरम्यान त्याने श्रद्धाची हत्या करून तिच्या शरिराचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. जबाबात आफताब सातत्याने त्याचे वक्तव्य बदलत आहे. त्यामुळे पोलिसांसमोर ठोस पुरावे गोळा करण्याचे मोठे आवाहन उभे राहिले आहे. अशात जंगलात श्रद्धाच्या शरीराचे आणखी दोन तुकडे सापडले आहेत.

पुरावे गोळा करत असतानाच आफताबला नार्कोटेस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पोलिस काल आफताबच्या गुरूग्राम येथील कार्यालयात पोहचले. इथे त्यांनी पुढील तपासाच्या दृष्टीने अनेक गोष्टी ताब्यात घेतल्या. तसेच आज पुन्हा एकदा पोलिसांनी आफताबच्या ऑफिसची पाहणी केली. आफताबने त्याच्या ऑफिसमध्येच हत्येसाठी वापरलेले शस्त्र लपवले असणार असा पोलिसांना दाट संशय आहे. त्यामुळे आज पोलिसांचे एक पथक मेटल डिटेक्टरसह त्याच्या ऑफिसमध्ये पोहचली होती. यासह पोलिसांचे एक पथक उत्तराखंड येथे देखील रवाना झाले आहे.

Shraddha Walker case
Shraddha Murder Case : श्रद्धा हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे; CCTV फुटेजमध्ये धक्कादायक माहिती उघड

आफताबने कबुली जबाब फिरवला

आफताबला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याने पोलिसांना हत्येची माहिती सांगितली होती. त्याने श्रद्धाचे ३५ तुकडे केल्याचे तो म्हटला होता. मात्र आता त्याने आपले विधान बदलून १८ तुकडे केल्याचे म्हटले आहे. आफताबच्या बदलत्या विधानांमुळे लवकरात लवकर ठोस पुरावे शोधून त्याला कठोरातील कठोर शिक्षा कशी होईल याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Shraddha Walker case
Thane Police : जितेंद्र आव्हाड यांना अटक करणाऱ्या पोलीस उपायुक्तांची बदली

आफताबविरोधात ठोस पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी (Police) त्याच्या माजी सहकाऱ्यांशी पोलिसांनी बातचित केली. एकाने सांगितले की, मी साल २०२० मध्ये या दोघांना भांडण करताना पहिल्यांदा पाहिले होते. मात्र आफताब इतका क्रूरपणे वागेल असे मला वाटले नव्हते.

आफताबने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

श्रद्धाचा मित्र गॉडविनने सांगितले होते की, श्रद्धाला आफताबने मारहाण केल्यावर माझा भाऊ आणि सरांच्या सांगण्यावरून मी तिला नालासोपारा येथील तुलिंज पोलिस ठाण्यात आणले होते. तेव्हा श्रद्धाने आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र आफताबने नंतर आत्महत्या करण्याची धमकी दिली आणि मोठा ड्रामा केला. त्यामुळे श्रद्धाने तक्रार मागे घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com