Shraddha Walker Case Update SAAM TV
देश विदेश

Shraddha Walker Case Update : आफताबची नार्को टेस्ट होणार, कोर्टाची परवानगी; मुंबईत आणणार?

आरोपी आफताबला कोर्टानं पुन्हा ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Shraddha Walker Case Update News : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानं संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. आता आरोपी आफताब याच्या नार्को टेस्टलाही कोर्टानं परवानगी दिली आहे. त्यामुळे आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

श्रद्धा वालकर प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होतील अशी शक्यता आहे. आरोपी आफताबची कोठडी संपल्यानंतर त्याला आज, गुरुवारी पुन्हा साकेत कोर्टात हजर करण्यात आले. त्याला कोर्टानं पुन्हा ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तसेच यावेळी आफताबची नार्को चाचणी करण्यास कोर्टानं परवानगी दिली आहे. (Latest Marathi News)

श्रद्धा वालकर प्रकरणाचा तपास अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. पाच दिवसांत दिल्ली पोलीस पुन्हा आरोपी आफताबची चौकशी करणार आहेत. पोलीस कोठडीतील पाच दिवसांमध्ये आफताबला घेऊन दिल्ली पोलीस हे मुंबईला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरतील. (Crime News)

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात केले हजर

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साकेत कोर्टात हजर करण्यात आले. साकेत कोर्टानं आफताबच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ केली. पोलिसांनी कोर्टाकडे आफताबला १० दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad To Arnala Fort: रायगड किल्ल्यावरून अर्नाळा किल्ल्यापर्यंत प्रवास कसा कराल? जाणून घ्या प्रमुख टप्पे आणि टिप्स

Nag Panchami 2025: नाग पंचमीला घरी पूजा कशी करावी?

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Mercury transit: 50 वर्षांनंतर नागपंचमीला शनीच्या नक्षत्रात बुध करणार प्रवेश; 'या' राशींचं नशीब पालटणार, आर्थिक स्थिती सुधारणार

राजकीय भूकंप! शरद पवार गटातील बड्या नेत्याचे शिलेदार भाजपच्या वाटेला; उल्हासनगरमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT