नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आता आफताब पूनावालाने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. श्रद्धाची गळा दाबून हत्या करणे सोपं होतं पण मृत्यदेहाचे तुकडे करणे, त्याची विल्हेवाट लावणे कठीण असल्याचं त्याने सांगितलंय. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यास 10 तास लागल्याचं आफताबने पोलिसांना सांगितलं. (Delhi)
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे त्याने पाण्याने धुतले. या दहा तासांदरम्यान थकवा आल्यावर त्याने विश्रांतीही घेतली. त्याने बिअर आणि सिगारेट प्यायली. आफताबने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर त्याने ऑनलाइन जेवण ऑर्डर केले. यानंतर त्याने नेटफ्लिक्सवर चित्रपटही पाहिला. (Latest Marathi News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतरही आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहत होता आणि ऑनलाइन अॅपद्वारे जेवणाची ऑर्डर देत असे. 9 जूनपर्यंत श्रद्धाच्या हत्येनंतर तो तिचे सोशल मीडिया अकाउंट चालवत होता आणि तिच्या मैत्रिणींशी बोलत होता. त्याने श्रद्धाच्या खात्यातून पैसेही ट्रान्सफर केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब या काळात इतर मुलींशीही संपर्क ठेवायचा आणि त्यांना आपल्या घरी आणायचा.
आफताबने सांगितले की, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून त्याने तिचा चेहरा जाळला. एवढेच नाही तर हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इंटरनेटवरही बऱ्याच गोष्टी सर्च केल्याची कबुलीही त्याने पोलिसांसमोर दिली आहे. खून केल्यानंतर जमिनीवरील रक्ताचे डाग साफ करण्यासाठी त्याने केमिकल आणि ब्लीच पावडरचा वापर केला होता. पुरावे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी ब्लीच पावडरचा वापर केला. याशिवाय जमिनीवर रक्ताचा एक डागही राहू नये म्हणून केमिकलचा वापर केला.
यामुळे दिल्ली पोलिसांना पुराव्यासाठी आव्हाने येत आहेत. आफताबने प्लान करून केलेल्या हत्येनं दिल्ली पोलिसही हैराण झाले आहेत. आफताबने घरातील बेडवर श्रद्धाचा गळा आवळून तिचा जीव घेतला. यानंतर त्यांच्या मृतदेहाचे 35 तुकडे करण्यात आले, मात्र घरात रक्ताचा एकही डाग नसल्यामुळे दिल्ली पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांच्या मते, रक्ताचे डाग शोधण्यासाठी पोलीस गुन्हा घडला त्या ठिकाणी बेंझिन नावाचे रसायन टाकतात. यामुळे जिथे-जिथे रक्त सांडते तिथे ती जागा लाल होते. पण माहित नाही आफताबने कोणत्या केमिकलने घर स्वच्छ केले आहे? खुनाच्या ठिकाणी बेंझिन हे रसायन टाकूनही रक्ताचे डाग सापडत नाहीत. मोठ्या कष्टाने किचनमध्ये एका ठिकाणी रक्ताचे डाग सापडले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.