Rajasthan Women Police End Life Saam Tv
देश विदेश

Shocking: व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत महिला पोलिसाची आत्महत्या, धावत्या ट्रेनसमोर मारली उडी

Rajasthan Women Police End Life: राजस्थानमध्ये महिला पोलिसाने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली. धावत्या ट्रेनसमोर उडी मारत या महिलेने आयुष्य संपवलं.

Priya More
  • राजस्थानमध्ये महिला पोलिसाची आत्महत्या

  • व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवल्यानंतर धावत्या ट्रेनसमोर मारली उडी

  • मृतदेह कुजलेल्या अवस्थेत रेल्वे रुळाजवळ आढळून आला

  • पोलिसांकडून आत्महत्येच्या कारणाचा तपास सुरू

राजस्थानमध्ये महिला पोलिसाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. जोधपूर पोलिस आयुक्तालयाच्या बसनी पोलिस ठाण्यामध्ये ही महिला पोलिस कार्यरत होती. जालोरच्या भिनमाल येथे ट्रेनसमोर उडी मारून महिला पोलिसाने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. आत्महत्या केलेली महिला पोलिस गेल्या अनेक दिवसांपासून कामावर गैरहजर होती. महिला पोलिसाचा मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुआ देवी (३० वर्षे) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिसाचे नाव होते. सुआ देवी मूळच्या जालोर जिल्ह्यातील भिनमाल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुनासा गावच्या रहिवासी होत्या. सध्या तया जोधपूर येथील बसनी पोलिस ठाण्यात हवालदार म्हणून त्या कार्यरत होत्या. पण सुआ देवी गेल्या काही दिवसांपासून कर्तव्यावर गैरहजर होत्या.

पोलिस सूत्रांनुसार, मंगळवारी संध्याकाळी भिनमाल शहरातील रामसीन रेल्वे क्रॉसिंगजवळ त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. गावकऱ्यांकडून आणि रेल्वे कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

जोधपूरमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहणाऱ्या महिला कॉन्स्टेबलने एक दिवसापूर्वी आपला व्हॉट्सॲपवर स्टेटस अपडेट केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोंबिवलीतील शिंदे गटाच्या नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक; डॉक्टरांना मारहाण करणं पडलं महागात

Maharashtra News Live Update: महाड शहरात पुन्हा शिरले पुराचे पाणी

शरद पवार एकनाथ शिंदेंच्या भेटीला; राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार? राजकीय घडामोडींना वेग|VIDEO

Pune : इमारतीच्या ढिगाऱ्याखाली १७ जण अडकले; नावं आली समोर, दबलेल्यांचा आवाज येतोय, ते जिवंत आहेत

Jackfruit Pakora: संध्याकाळच्या नाश्त्याला काहीतरी वेगळं खायचंय? मग घरच्या घरी बनवा फणसाची भजी

SCROLL FOR NEXT