Crime News Saam Tv
देश विदेश

अंगावर काटा आणणारी घटना, शेतकऱ्याने २ मुलांना अंगणात संपवलं, त्यानंतर कुटुंबासह पेटवून घेतलं, ६ जणांचा मृत्यू

UP farmer kills children and sets house on fire : उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील निंदुनपुरवा टेपरहा गावात हृदयविदारक घटना घडली. शेतात काम करण्यास नकार दिल्यामुळे दोन अल्पवयीन मुलांची हत्या करून आरोपीने स्वत:च्या कुटुंबासह घराला आग लावली.

Namdeo Kumbhar

उत्तर प्रदेशमध्ये अंगावर काटा आणणारी एक घटना समोर आली आहे. शेतात काम करण्यास नकार दिल्यामुळे दोन मुलांची हत्या केली. त्यानंतर त्यांचे मृतदेह घरात टाकले अन् कुटुंबासह पेटवून घेतलं. या घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आरोपीने दोन मुलांची हत्या केल्यानंतर मृतदेह घरात घेऊन गेला अन् दार बंद करून घराला आग लावली. यामध्ये आरोपीची पत्नी अन् दोन मुलांचाही मृत्यू झाला. घरात टॅक्टरला बांधलेल्या गायींचाही होरपळून मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशमधील बहराइच जिल्ह्यातील निंदुनपुरवा टेपरहा गावात बुधवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. शेतात पेरणीसाठी विजय याने गावातील दोन अल्पवयीन मुलांना कामासाठी बोलवलं होतं. सूरज यादव (14) सनी वर्मा यांनी काम करण्यास नकार दिला. नवरात्र आहे, घरात खूप काम आहेत, असे सांगत दोन्ही मुलांनी शेतात काम करण्यास नकार दिला. मुलांच्या नकार ऐकून विजय याचा राग अनावर आला. संतापलेल्या विजयने घराच्या अंगणातच दोन्ही मुलांचा जीव घेतला.

मुलांचा जीव घेतल्यानंतर विजय तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने त्या दोन्ही मुलांचे मृतदेह घरात टाकले अन् स्वत:सह घराला आग लावली. आरोपीची पत्नी अन् दोन्ही मुलेही त्यावेळी घरात होते. आगीची माहिती मिळताच पोलीस अन् अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झालेय. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, पण तोपर्यंत सर्व काही संपवले होते. हृदय विदारक घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला अन् चार गायी होरपळून मेल्या.

पोलिसांकडून या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमागे दुसरं काही कारण आहे का? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. सहा जणांच्या मृताची बातमी ऐकताच गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आरोपी विजय कुमार शेती अन् पशुपालनाचा व्यवासाय करत होता. फक्त मुलांनी काम करण्यास नकार दिल्यामुळे टोकाचा निर्णय घेतला का? याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Fire : क्षणात सर्व काही घडलं, पिंपरी-चिंचवडमध्ये PMPML बस आगीच्या भक्ष्यस्थानी; राज्यात दिवसभरातील तिसरी घटना

CNG Crisis: मुंबईसह उपनगरात सीएनजी तुटवडा, पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: ...तर शरद पवार गट मुक्ताईनगरात निवडणूक लढविणार नाही; आमदार खडसेंची घोषणा

Chhattisgarh : सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 5 लाखांचं बक्षीस असलेल्या ३ नक्षलवाद्यांचा खात्मा

Rakul Preet Singh: 'दे दे प्यार दे २' मधील रकुल प्रीत सिंगचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? PHOTO व्हायरल

SCROLL FOR NEXT