Kudal : प्रेमातून भयानक कृत्य, मुलीला जंगलात नेलं अन्..., २ महिन्यानंतर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

Maharashtra shocking Kudal Crime News : कुडाळमध्ये बेपत्ता अल्पवयीन मुलीचा घातपात झाल्याचं समोर आले आहे. दोन महिन्यापासून बेपत्ता असणाऱ्या मुलीचा जंगलात नेऊन निर्घृण खून केला.
Maharashtra shocking Kudal Crime News
Maharashtra shocking Kudal Crime News
Published On

विनायक वंजारी, साम टीव्ही प्रतिनिधी

Kudal minor girl murder love affair case Maharashtra : प्रेम प्रकरणातून कुडाळमध्ये १७ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. घावनळे गावातील दीक्षा २ ऑगस्टपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह जंगलात आढळलाय. दोन महिन्यापूर्वी दीक्षा घरातून अचानक गायब झाली होती. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून तिचा शोध घेतला जात होता. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली. जंगलातील शेतात नेहून तिचा गळा दाबल्याचं समोर आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.

(17 year old girl missing found dead in forest Kudal)

कुडाळ तालुक्यातील घावनळे (वायगंणवाडी) येथील दोन ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय दीक्षा बागवे या अल्पवयीन मुलीचा घातपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र पोलिस प्रशासनाने या घटनेबद्दल कमालीची गुप्तता बाळगली आहे. घावनळे गावातील ही मुलगी दोन ऑगस्ट रोजी अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून कुडाळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

Maharashtra shocking Kudal Crime News
७५ व्या वर्षी ३५ वर्षाच्या मुलीसोबत विवाह, लग्नाची पहिली रात्र उलटताच वृद्धाचा मृ्त्यू, नेमकं काय घडलं?

एका महिन्यापासून पोलीस आणि नातेवाईक तिचा शोध घेत होते. मात्र, तब्बल एक महिन्यानंतर पोलिसांच्या तपासात या मुलीचा खून झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात एका संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. माणगाव खोऱ्यातील गोठोस गावातील जंगलातील एका शेत मांगरात नेऊन गळा दाबून या अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आला आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याची माहितीही समोर येत आहे. सध्या फॉरेन्सीक एक्स्पर्ट टीम घटनास्थळावर दाखल झाली असून अधीक तपास करण्यात येत आहे. पोलीसांनी आरोपी कुणाल कुंभार याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. १७ वर्षांच्या मुलीच्या हत्येने कुडाळ हादरलेय.

Maharashtra shocking Kudal Crime News
Mumbai News : बोरिवली स्टेशनवर फिल्मी स्टाईल दरोडा, ६ जणांनी लाखो रूपयांवर केला हात साफ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com