Mumbai News : बोरिवली स्टेशनवर फिल्मी स्टाईल दरोडा, ६ जणांनी लाखो रूपयांवर केला हात साफ

borivali station theft : बोरिवली स्टेशनवरील दरोड्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. फिल्मीस्टाईल दरोड्याने पोलिसही चक्रावले होते.
Mumbai Crime Latest News
Mumbai Crime Latest NewsSaam TV Marathi
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Crime Latest News : बोरिवली स्टेशनवर झालेल्या तब्बल ४.५ लाख रुपयांच्या फिल्मी स्टाईल दरोड्याचा बोरिवली जीआरपीने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय सूत्रांचा वापर करून सहा आरोपींना अटक करण्यात आली असून जीआरपी ने त्यांच्याकडून.२.८५ लाख रुपये जप्त केले आहेत.अहमद शेख (३२), मंगलराज राय (२८), तानाजी माने (३०), राजू शेख (२६), कृष्णा कानजोडकर (४०) आणि सुरेश कुलकर्णी (५६)अशी अटक केलेल्या आरोपींची नावे अशी आहेत. हे सर्व आरोपी मुंबई आणि ठाणे परिसरातील असून, त्यांच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नोटा बदलून देण्याचे काम करत होते. आरोपींना दोन हजार रुपयांच्या साडेतीनशे नोटा बदलून देण्याचे फिर्यादीने कबूल केले होते. यासाठी फिर्यादी त्यांना त्या बदल्यात कमिशन घेऊन सहा लाख रुपये देणार होता. यासाठी फिर्यादी व आरोपी यांच्यात ठरल्याप्रमाणे बोरिवली पुलाखाली भेटण्याचे ठरले. फिर्यादी ठरल्याप्रमाणे बोरिवली पुलाखाली भेटण्यासाठी गेला. मात्र फिर्यादीने बागेत सहा लाख रुपये आणण्याचे आरोपींच्या लक्षात येतात त्यांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली पाठलाग करत तुला घालून प्लॅटफॉर्म क्रमांक एक पर्यंत पाठलाग करत पुढे रेल्वे मध्ये चढून हातापायी करत फिर्यादीच्या बागेतील रोख रक्कम पळवली.

Mumbai Crime Latest News
Cylinder Price: दसऱ्याआधी महागाईचा चटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

आरोपींच्या ११ सप्टेंबर रोजी या सहा चोरांनी तक्रारदाराचा पाठलाग करून फिल्मी स्टाईलने ४.५ लाख रुपयांची लूट केली होती. प्रकरणी फिर्यादीने बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्यानंतर जीआरपीने सखोल तपास करत आरोपींना मुंबई आणि ठाण्यातून बेड्या ठोकल्या.

Mumbai Crime Latest News
ST Fare Hike : एसटी बसच्या तिकिट दरात मोठी वाढ, दिवाळीआधी सर्वसामान्यांना झटका

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून २ लाख ८५ हजार रुपये रोख जप्त केले असून, या टोळीने अशाच पद्धतीने इतर रेल्वे दरोडे केल्याची माहिती समोर आली आहे. दत्ता कूपरेकर (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बोरिवली जीआरपी) – “संपूर्ण तपास तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीच्या आधारे करण्यात आला. आरोपींचा गुन्हेगारी इतिहास तपासला जात आहे.”

Mumbai Crime Latest News
Ahilyanagar : अहिल्यानगरातील हिंसाचार प्रकरणी नवा व्हिडीओ समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com