Greater Noida toilet explosion, flush blast accident AI Image, Saam TV News
देश विदेश

Shocking : फ्लश दाबला अन् टॉयलेटमध्ये स्फोट झाला, तरूण गंभीर जखमी

shocking toilet exploded after a flush : ग्रेटर नोएडामध्ये फ्लश करताच टॉयलेटमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली. मिथेन गॅसच्या दाबामुळे हा स्फोट झाला असून २० वर्षीय तरुण गंभीर भाजला.

Namdeo Kumbhar

Shocking Toilet Explosion in Greater Noida : उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. फ्लश दाबल्यानंतर टॉयलेटमध्ये जोरदार स्फोट झाला. त्यानंतर भीषण आग लागली. या घटनेत २० वर्षीय तरूण गंभीर जखमी झालाय. उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडाच्या सेक्टर ३६ मध्ये रविवारी ही धक्कादायक घटना घडली. या दुर्दैवी घटनेत आशू नागर हा तरुण दुखापतग्रस्त झालाय. तरूणाचा चेहरा, हात अन् पाय गंभीर भाजले गेलेत. तरूण या अपघातात ३५ टक्के भाजला गेलाय. तरूणाला जवळच्या जिम्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय.

टॉयलेटमध्ये स्फोट होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी २०१८ मध्ये नवी मुंबईतही असाच स्फोट झाला होता. त्यामध्ये ती व्यक्ती जखमी झाली होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सीवर लाईनमधील मिथेन गॅसचा दाब वाढला आणि हवेशी संपर्क आल्यास यासारखे स्फोट होऊ शकतात. ग्रेटर नोएडामधील या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिकांनी प्रशासनाला सीवर व्यवस्थेची नियमित तपासणी आणि देखभाल करण्याची मागणी केली आहे.पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आणि संशयास्पद वास आल्यास त्वरित प्रशासनाला कळवण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशू नागर टॉयलेटमध्ये गेला होता. फ्लश दाबताच जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका तीव्र होता की, टॉयलेट सीटचे तुकडे झाले आणि आग लागली. या घटनेत आशू गंभीर जखमी झालाय. अंगावर जखमा आहेत, त्याशिवाय तो गंभीर भाजला गेलाय. प्राथमिक तपासात सीवर लाईनमधील अडथळ्यामुळे मिथेन गॅस तयार झाल्याने हा स्फोट झाल्याचा संशय आहे. या गॅसच्या दाबामुळे टॉयलेट सीट फुटली आणि आग पसरली. स्थानिकांनी त्वरित आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि आशूला रुग्णालयात नेले.

टॉयलेटमध्ये स्फोट झाल्याची घटनेने एकच खळबळ उढाली. येथील स्थानिकांनी ग्रेटर नोएडा प्राधिकरणावर निष्काळजीपणाचा आरोप केलाय. सीवर लाईनची नियमित देखभाल न झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. नागरिकांच्या संतापानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. राकेशकुमार यांनी सांगितले की, सीवर लाईनच्या देखभालीचा अहवाल तपासला जाईल. प्राधिकरणानेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Shape : तुमचा चेहरा कोणत्या आकाराचा? ही ट्रिक वापरा अन् लगेच ओळखा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Infertility treatment: गर्भधारणेमध्ये अडथळा येत असलेल्या महिलांसाठी 'ही' थेरेपी ठरेल आशेचा किरण; पाहा काय आहे ही थेरेपी?

SCROLL FOR NEXT