Pune : १५८९ किमीचे अंतर फक्त २० तासांत, पुण्यातून दिल्लीसाठी धावणार वंदे भारत स्लीपर

Pune to Delhi Vande Bharat sleeper : पुणे ते दिल्ली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार असून, ही ट्रेन १५८९ किमीचे अंतर २० तासांत पार करणार आहे. जाणून घ्या थांबे, वेळापत्रक आणि एसी तिकीट दर.
Pune Vande Bharat Sleeper :
Pune Vande Bharat Sleeper :Saam TV News
Published On

Pune Vande Bharat Sleeper : पुणे ते नवी दिल्ली या मार्गावर भारतीय रेल्वेकडून लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. ही सेमी हायस्पीड ट्रेन पुणे आणि दिल्ली या दोन शहरांमधील अंतर कमी करेलच, त्याशिवाय प्रवास आरामदायी होणार आहे. पुण्यातून निघणारी वंदे भारत स्लीपर १५८९ किमीचे अंतर २० तासांत पार करेल. पुणे-दिल्ली या मार्गावर धावणाऱ्या सर्व ट्रेनमध्ये ही वेगवान असेल. वंदे भारत स्लीपर ट्रेन १६० किमी प्रतितास वेगाने धावेल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली आहे. लवकरच पुण्यातून दिल्लीसाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या ट्रेनसाठी रेल्वेकडे पाठपुरावा केला होता.

नवी दिल्ली ते पुणे, कोण कोणत्या ठिकाणी थांबणार? तिकिट किती असेल? Vande Bharat sleeper fare, stops, Pune Delhi train

नवी दिल्ली रेल्वे स्थानक (एनडीएलएस) येथून पुण्यासाठी निघणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन मथुरा, आग्रा कॅन्ट, ग्वाल्हेर, भोपाळ जंक्शन, खंडवा आणि भुसावळ या प्रमुख स्थानकांवर थांबेल. या ट्रेनमध्ये एकूण १६ डबे असतील, यात ११ एसी ३ टियर, ४ एसी २ टियर आणि १ फर्स्ट क्लास एसी बोगी असीतल. इकॉनॉमिक टाइम्स नाऊच्या अहवालानुसार, एसी ३ टियरचे तिकीट २५०० रुपये इतके असेल. तर एसी २ टियरचे ४००० रुपये आणि फर्स्ट क्लास एसीचे ५००० रुपये असण्याची शक्यता आहे.

Pune Vande Bharat Sleeper :
Pune : पुण्यातून धावणार वंदे भारत स्लीपर, तिकीट किती, थांबा कुठे? जाणून घ्या डिटेल्स

कोणत्या वेळेला धावणार वंदे भारत स्लीपर ? Vande Bharat sleeper train timings

वंदे भारत स्लीपर ही ट्रेन नवी दिल्लीहून सायंकाळी ४:३० वाजता निघेल आणि रात्री १:०० वाजता पुणे जंक्शनवर पोहोचेल. परतीच्या प्रवासात पुण्याहून दुपारी ३:०० वाजता ही ट्रेन निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:३० वाजता दिल्लीला पोहोचेल. नवी दिल्ली आणि पुणे या दोन शहरांमध्ये प्रवास कऱणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या ट्रेनमुळे प्रवाशांना आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळेल. यामुळे व्यवसायिक, पर्यटक आणि कुटुंबांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरेल. लवकरच वंदे भारत स्लीपर ही ट्रेन सुरू धावण्याची शक्यता आहे.

Pune Vande Bharat Sleeper :
Vande Bharat : वंदे भारत नागपूरहून मुंबईसाठी धावणार, कुठे कुठे थांबणार? तिकीट किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com