TCS Manager Manav Sharma saam tv
देश विदेश

Shocking Data : ८ वर्षांत ८००००० पुरुषांच्या आत्महत्या; अनेकांचं जीवन संपवण्याचं कारणही धक्कादायक, आकडेवारीही चक्रावून टाकणारी

manav sharma case update : ८ वर्षांत ८००००० पुरुषांच्या आत्महत्या केल्यात.अनेकांचं जीवन संपवण्याचं कारणही धक्कादायक आहे. पुरुषांच्या आत्महत्येची आकडेरवारी चक्रावून टाकणारी आहे.

Vishal Gangurde

अतुल सुभाषनंतर मानव शर्माने आयुष्य संपवल्यानंतर देशात खळबळ उडाली आहे. मानव शर्माने बायकोच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. मानव शर्माच्या आत्महत्येनतंर हुंडा प्रतिबंधक कायदा, घटस्फोट आणि अनैतिक संबंध कायदा सारख्या कायद्यात बदल करण्याची मागणी केली जात आहे. देशात पुरुषांचं आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढल्याने सवाल उपस्थित केले जात आहे.

पुरुषांच्या आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी

एनसीआरबी रिपोर्टनुसार, पुरुषांच्या आत्महत्येची आकडेवारी धक्कादायक आहे. ८ वर्षांत ८ लाखांहून अधिक जणांनी आत्महत्या केली आहे. २०१५ ते २०२२ या कालावधित ८.०९ लाख पुरुषांनी आत्महत्या केली. यामध्ये बहुतांश पुरुषांची लग्न झालेले होते. अनेकांनी वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अडचणीमुळे आत्महत्या केल्याचे उघड झालं आहे. तर ८ वर्षात ४३.३१४ महिलांनी आत्महत्या केली आहे. ही संख्या पुरुषांच्या तुलनेत निम्मी आहे.

NCRB 2021 रिपोर्टनुसार, देशभरात १.६४ लाखांहून अधिक लोकांनी आत्महत्या केली आहे. त्यात ८१००० लग्न झालेले पुरुष आहेत. तर २८००० लग्न झालेले महिला आहेत. NCRB रिपोर्टनुसार, 33.2 टक्के पुरषुांनी कुौटुंबीक कारणांमुळे आतमहत्या केली आहे. या रिपोर्टमध्ये कारणाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली नव्हती. त्यात भांडणे, मानसिक छळ, वादविवाद, शारीरिक छळ याचा समावेश आहे.

हुंडा प्रतिबंधक कायद्यावर प्रश्नचिन्ह

भारतीय दंड संहितेनुसार ४९८ कलम आता बीएनएसनुसार कलम ८५ आणि ८६ करण्यात आला आहे. हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येते. मात्र, महिलांकडून या कायद्याचा दुरुपयोग केला जातो, असा आरोप केला जातो. सुप्रीम कोर्टात १० डिसेंबर २०२४ रोजी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बहुतांश महिलांनी कायद्याचा गैरवापर केल्याचं विधान कोर्टाने केलं होतं. पुरुषाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर महिलांना प्रबळ पुरावा देण्याची गरज नव्हती. त्यामुळे पुरुषांना निर्दोष मुक्तता व्हावी, यासाठी प्रबळ पुरावे द्यावे लागत होते.

अनैतिक संबंध

आयपीसी कलम ४९७ कलमानुसार अनैतिक संबंध हा गुन्हा असल्याचं सांगण्यात आलं आहे. लग्न झालेल्या पुरुषाचं एखाद्या स्त्रीसोबत असेल, तर कडक कारवाई केली जाते. २०१८ साली सुप्रीम कोर्टाने कलम ४८७ रद्द केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT